Ganesh Chaturthi 2025: एक 'अशी' अद्भूत गणेशमूर्ती, जी हवेत राक्षसाचा करतेय वध? बाप्पाचा चमत्कार की गुरुत्वाकर्षणाला आव्हान? नेटकरीही थक्क
Ganesh Chaturthi 2025: सोशल मीडियावर सध्या एका गणेशमूर्तीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्याला पाहून प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करतोय. गणेशोत्सव पूर्वी बाप्पांचा हा चमत्कार तर नाही ना? असं म्हटलं जातंय..

Ganesh Chaturthi 2025: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. या निमित्त अवघ्या देशभरात जय्यत तयारी सुरू झालीय. काही सार्वजनिक मंडळाच्या गणेशाचे आगमन देखील होऊ लागलंय. अशात एका अद्भूत, अनोख्या गणेश मूर्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. मुंबईतील एका सार्वजनिक मंडळाची ही बाप्पाची मूर्ती आहे. जिला पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करतायत. कारण ही मूर्ती कुठल्याही आधाराशिवाय हवेत तरंगत असल्याचं दिसतंय. या मूर्तीकडे पाहता हा जणू काय बाप्पाचा चमत्कारचं आहे की काय, असं म्हणतायत. तर काही जण ही मूर्ती म्हणजे न्यूटच्या गुरूत्वाकर्षाणाला एक आव्हान असल्याचं म्हटलं जातंय.
जणू बाप्पा हवेत राक्षसाचा वध करतायत?
आपण ज्या गणेशमूर्ती बद्दल बोलत आहोत, ती मुंबईतील परेलच्या महाराजांची अनोखी मूर्ती चर्चेत आहे. शिल्पकार अरुण दत्ते या मूर्तीला यांनी संतुलितपणे असा आकार दिला आहे, जणू गणेशजी हवेत राक्षसाचा वध करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गुरुत्वाकर्षणाला आव्हान देणारी मूर्ती...
गणेशोत्सवाला फक्त एक आठवडा उरला आहे. विशेषतः महाराष्ट्रात आणि मुंबई,पुण्यात हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. ठिकठिकाणी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात गणेश मूर्तींची स्थापना केली जाईल. या सर्व मूर्तींपैकी, सर्वात जास्त लोकांचे लक्ष वेधून घेतलेली मूर्ती म्हणजे परेलच्या महाराजांची अनोखी मूर्ती. यावर्षी परेलचा महाराजा त्यांचा 82 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत आणि यावेळी आयोजकांनी काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गुरुत्वाकर्षणाला आव्हान देणारी अशी मूर्ती बनवली आहे. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाला आव्हान देणारा मुंबई डायरीज नावाच्या पेजवरून इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल, नेटकरी थक्क..
व्हायरल व्हिडीओत दिसत असलेल्या बाप्पांच्या या मूर्तीत भगवान गणेश एका राक्षसाचा वध करत असल्याचे दाखवले आहे. या अद्भुत मूर्तीचे मूर्तीकार अरुण दत्ते आहेत, जे मुंबईतील प्रसिद्ध शिल्पकारांपैकी एक आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अरुण दत्ते यांनी गणरायाची अधांतरी मूर्ती साकारली आहे. जी जवळपासून पूर्णच हवेत आहे. ज्यामध्ये गणरायाच्या हातात तलवार, सुदर्शन चक्र आणि परशु (कुऱ्हाड) आहे आणि राक्षसांचा संहार करतानाची गणरायाची मूर्ती पाहून सारेच अवाक् झाले आहेत. या अद्भुत कलाकृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.




















