एक्स्प्लोर

Father's Day 2024 : यंदाचा फादर्स डे बनवा खास! वडिलांना राशीनुसार द्या 'हे' गिफ्ट्स, नात्यात वाढेल गोडवा

Father's Day Gifts 2024 : यंदाचा फादर्स डे 16 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. आता खास डे म्हटल्यानंतर गिफ्ट घेणं आलंच.

Father's Day Gifts 2024 : आपल्या वडिलांविषयी प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा दाखविण्यासाठी जागतिक 'फादर्स डे' (Fathers Day) दरवर्षी साजरा केला जातो. त्यानुसार, यंदाचा फादर्स डे 16 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. आता खास डे म्हटल्यानंतर गिफ्ट घेणं आलंच. तर, तुम्हालाही तुमच्या वडिलांसाठी काही स्पेशल गिफ्ट घ्यायचं असेल तर त्यासाठी तुमच्या राशीनुसार कोणतं गिफ्ट तुमच्या वडिलांसाठी तुम्ही घेऊ शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीचे वडील फार अॅक्टिव्ह असतात. त्यांना नेहमीच आव्हांनाना स्विकारायला आवडतं. तसेच, ते फार हसमुख स्वभावाचे असतात. प्रचंड शिस्तीचे असल्या कारणाने त्यांना तंदुरुस्त राहायला आवडतं. यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी छानसे बूट किंवा एखादं स्मार्टवॉच गिफ्ट म्हणून देऊ शकता.  

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीचे वडील फार फूडी आणि आरामदायी व्यक्तिमत्त्वाचे असतात. त्यांना महागड्या म्हणण्यापेक्षा चांगल्या गोष्टी क्वालिटी गोष्टींकडे त्यांचा कल असतो. अशा वेळी तुम्ही त्यांना छानशी फूड ट्रिट देऊ शकता. तसेच, पदार्थांमध्ये वेगवेगळे एक्सपरिमेंट्स केलेले पदार्थ त्यांना द्या. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या वडिलांचा स्वभाव कुतूहलाचा आणि नवीन गोष्टी शिकण्याचा असतो. अशा व्यक्तीच्या लोकांना सामाजिक कार्य करायला फार आवडतं. तुम्ही त्यांच्यासाठी छानसं मासिक किंवा एखादं पुस्तक भेट म्हणून देऊ शकता. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीचे वडिल फार काळजी घेणारे असतात. तसेच, आपल्या कुटुंबियांबर निस्सीम प्रेम करणारे असतात. त्यांना भावनिक गोष्टींमध्ये फार आवड असते. अशा वेळी तुम्ही त्यांना छानसा फॅमिली फोटो किंवा अल्बम भेटवस्तू म्हणून देऊ शकता. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीचे वडील फार आत्मविश्वासू स्वभावाचे असतात. त्यांना लोकांचं अटेंशन घ्यायला फार आवडतं. त्यांच्या भावनांचा आदर करणारे गिफ्ट्स त्यांना फार आवडतात. त्यांना तुम्ही एखाद्या छानशा मैफिलीचं, नाटकाचं तिकीट भेट म्हणून देऊ शकता. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीचे वडील फार व्यावहारिक असतात. आपल्या कार्यक्षमतेला ते जास्त प्राधान्य देतात. त्यांना विचारपूर्वक दिलेले भेटवस्तू आवडतात. त्यामुळे तुम्ही त्यांना अशी एखादी भेटवस्तू द्या जी त्यांच्या खरंच उपयोगी येईल. त्यांचं काम त्यामुळे सोपं होईल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तुला राशीचे वडील आनंददायी, मैत्रीपूर्ण आणि सौंदर्याची प्रशंसा करणारे असतात. त्यांना छानसे स्टायलिश पण त्यांच्या लाईफस्टाईलशी संबंधित गिफ्ट्स त्यांना आवडतात.  तुम्ही त्यांना होम डेकॉरशी संबंधित वस्तू गिफ्ट्स देऊ शकता. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीचे वडील फार भावनिक असतात. तसेच, ऐतिहासिक गोष्टींविषयी जाणून घेण्याची त्यांची आवड असते इच्छा असते. तुम्ही त्यांना ऐतिहासिक कादंबरी किंवा ऐतिहासिक वस्तू गिफ्ट देऊ शकता. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीचे वडील तात्विक आणि साहसी स्वभावाचे असतात. त्यांना प्रवास करायला फार आवडतो. तुम्ही त्यांना फॅशनेबल पास होल्डर, किंवा छानशी बॅकपॅक किंवा पोर्टेबल चार्जर गिफ्ट म्हणून देऊ शकता. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

तत्त्वनिष्ठ आणि महत्त्वाकांक्षी असे मकर राशीचे वडील असतात. ते व्यवहारिकतेला जास्त महत्त्व देतात. तुम्ही त्यांना उपयुक्ततावादी गिफ्ट्स भेट देऊ शकता. तुम्ही त्यांना रेसॉर्टच्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीचे लोक फार इनोव्हेटिव्ह आणि स्वतंत्र विचारांचे असतात. त्यांना टेक्नॉलॉजी संबंधित माहिती मिळवायला तसेच सोशल मीडियावर एॅक्टिव्ह राहायला आवडते. तुम्ही त्यांना छान हेडसेट किंवा स्मार्टफोन गिफ्ट म्हणून देऊ शकता. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीचे वडील दयाळू, सर्जनशील आणि अंतर्ज्ञानी असतात. त्यांना त्यांच्या क्रिएटिव्हीटीशी संबंधित एखादी छानशी भेटवस्तू गिफ्ट म्हणून देऊ शकता. 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

हेही वाचा :

Father's Day 2024 : फादर्स डे येतोय! वडिलांना सरप्राईझ द्यायचंय? भारतातील या 3 ठिकाणी घेऊन जा अन् आनंद अनुभवा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget