Dussehra 2025 Wishes : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' हटके शुभेच्छा; सणाचा आनंद द्विगुणित करा
Dussehra 2025 Wishes : हिंदू धर्मात या दिनाला विशेष महत्त्व आहे. तसेच, साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असल्या कारणाने या दिवशी अनेक नवीन कामाची सुरुवात केली जाते. खरेदी केली जाते.

Dussehra 2025 Wishes : हिंदू धर्मशास्त्रानुसार, उद्या विजयादशमीचा दिवस म्हणजेच दसऱ्याचा (Dasara 2025) दिवस आहे. दसऱ्यालाच विजयादशमी (Vijayadashmi), दशहरा या नावाने संबोधले जाते. या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात या दिनाला विशेष महत्त्व आहे. तसेच, साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असल्या कारणाने या दिवशी अनेक नवीन कामाची सुरुवात केली जाते. खरेदी केली जाते.
आता सण म्हटला की, शुभेच्छा देणं आलंच. त्यानुसार, तुम्हाला देखील तुमच्या नातेवाईकांना, मित्र-परिवाराला, तसेच आप्तेष्ट मंडळींना सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खास शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्याच आम्ही इथे सांगणार आहोत. हे शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही सणाचा आनंद द्विगुणित करु शकता.
तुमच्या प्रियजनांना पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश...
झेंडुची फुले, आपट्याची पाने
घेऊन आली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी
सुख-समृद्धी लाभो तुमच्या जीवनी...
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आंब्याच्या पानांची केली कमान,
अंगणात काढली रांगोळी छान,
अश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा
आपट्याची पाने देऊन करुयात साजरा...
दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जल्लोष विजयाचा..
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त
सण हा दसऱ्याचा.
दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा
वाईटावर चांगल्याचा आणि
अधर्मावर धर्माचा विजयाचा
महान सण विजयादशमीच्या
निमित्ताने तुम्हा सर्वांना
हार्दिक शुभेच्छा...
दसऱ्याच्या दिवशी शत्रूंचा करा खात्मा
नकारात्मक उर्जेवर करा मात
आयुष्याच्या नव्या अध्यायाचा करा शुभारंभ
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
आंब्याच्या पानांच्या तोरणांनी दरवाजा सजला
झेंडुच्या फुलांनी दसऱ्याचा सण बहरला...
सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आपट्याची पानं त्याला हृदयाचा आकार
हा आनंदाचा क्षण करा आनंदाने साकार
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवणी
सोन्यासारख्या लोकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















