Dussehra 2024 : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर राशीनुसार खरेदी करा 'या' वस्तू; घरात सुख-समृद्धीची होईल बरसात
Dussehra 2024 : दसऱ्याचा दिवस खरेदीसाठी शुभ मानला जातो. त्यानुसार, या दिवशी राशीनुसार तुम्ही कोणत्या वस्तूंची खरेदी करावी हे जाणून घेऊयात.
Dussehra 2024 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसऱ्याचा (Dussehra 2024) सण हा अत्यंत शुभ मानला जातो. वाईटावर सत्याचा विजय म्हणून या दिवसाकडे पाहिलं जातं. तसेच, या दिवसाचे अनेकही अनेक संदर्भ आहेत. दसऱ्याचा दिवस खरेदीसाठी शुभ मानला जातो. त्यानुसार, या दिवशी राशीनुसार तुम्ही कोणत्या वस्तूंची खरेदी करावी हे या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुमच्या राशीनुसार 'या' वस्तू खरेदी करा
मेष रास - मेष राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शमीचं रोप खरेदी करु शकता. यामुळे तुमच्या जीवनातील गरिबी दूर होईल.
वृषभ रास - या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी वाहन खरेदी करणं शुभ ठरु शकतं. यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी येईल.
मिथुन रास - या राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी एखादे मातीचे भांडे खरेदी करणं शुभ ठरेल. यामुळे तुमच्या घरात बरकत टिकून राहील.
कर्क रास - कर्क राशीच्या लोकांनी आजच्या शुभ मुहूर्तावर पितळ्याचा कलश खरेदी करणं शुभ मानलं जातं. पितळ्याच्या कलशावर कुबेर वास करतो अशी पौराणिक मान्यता आहे.
सिंह रास - एखाद्या सणसमारंभाला सोन्या- चांदीची नाणी खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यानुसार, दसऱ्याच्या दिवशी तुम्ही चांदीची नाणी खरेदी करु शकता.
कन्या रास - कन्या राशीच्या लोकांनी कामधेनु मूर्ती खरेदी करणं शुभ मानलं जाईल. कामधेनु ही इच्छा पूर्ण करणारी गाय म्हटलं जातं.
तूळ रास - तूळ राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी तुळशीचं रोप लावावं. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता येईल.
वृश्चिक रास - या राशीच्या लोकांना चांदीच्या वस्तू फार लाभदायक ठरतात. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही चांदीची भांडी, चांदीची नाणी यांसारख्या वस्तू खरेदी करु शकता.
धनु रास - या राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी सोनं खरेदी करणं लाभदायक ठरणार आहे.
मकर रास - मकर राशीच्या लोकांवर देवी सरस्वतीची कृपा असल्यामुळे तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेत भर पडणाऱ्या गोष्टी खरेदी करु शकता.
कुंभ रास - या राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी रुमाल किंवा एखादं कापड खरेदी करणं शुभ राहील.
मीन रास - दसऱ्याच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी भविष्याचा विचार करता पैशांची गुंतवणूक करणं फार शुभ मानलं जाणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: