Dhanteras 2024 : एकवेळ सोनं-चांदी, भांडी खरेदी करा पण धनत्रयोदशीला चुकूनही 'या' वस्तू खरेदी करु नका
Dhanteras 2024 : हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदी आणि पितळेच्या-तांब्याच्या वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं.
Dhanteras 2024 : दिवाळीचा सण अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीची (Diwali 2024) सुरुवात धनत्रयोदशीपासून (Dhanteras 2024) होते. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्ष तिथीला साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार, यावर्षी 29 ऑक्टोबर 2024 रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदी आणि पितळेच्या-तांब्याच्या वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. मान्यतेनुसार, या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंमुळे घरात सुख-समृद्धी येते. तसेच, धन-संपत्तीत चांगली वाढ होते असं म्हणतात. पण, या दिवशी काही वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. या वस्तू नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
लोखंडाची भांडी
धनत्रयोदशीच्या दिवशी अनेकदा लोक भांडी खरेदी करतात. या दरम्यान लोखंडाची भांडी खरेदी करु नका. या व्यतिरिक्त तुम्ही स्टील किंवा एल्युमिनियमची भांडीसुद्धा खरेदी करु नये.
काळ्या रंगाच्या वस्तू
धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू जसे की, बॅग, कपडे, बूटं इ. वस्तूंची देखील खरेदी करणं अशुभ मानलं जातं.
काचेच्या वस्तू
असं म्हणतात की, धनत्रयोदशीच्या दिवशी काचेच्या वस्तू देखील खरेदी करु नयेत. या दिवशी काचेची भांडी किंवा सजावटीच्या वस्तूदेखील खरेदी करु नयेत.
खोट्या वस्तू
या दिवशी चाकू, कैची, सुईसह कोणत्याही वस्तूंची खरेदी करु नका.
आर्टिफिशियल ज्वेलरी
धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं आणि चांदीपासून बनवलेल्या वस्तू शुभ मानल्या जातात. मात्र, या दिवशी आर्टिफिशियल ज्वेलरीची खरेदी करु नये.
प्लास्टिकच्या वस्तू
धनत्रयोदशीच्या दिवशी प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंची देखील खरेदी करणं अशुभ मानलं जातं.
धनत्रयोदशीला सोनं, चांदीच्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण, जर तुम्ही या वस्तूंची खरेदी केली तर ते अशुभतेचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे या वस्तूंची खरेदी करु नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: