एक्स्प्लोर

Dhanteras 2024 : आज धनत्रयोदशी; 'या' शुभ मुहूर्तावर करा धनाची पूजा, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ

Dhanteras 2024 Date : आज धनत्रयोदशीपासून दिवाळीची सुरुवात होते. या दिवशी धनाची पूजा केली जाते, ही पूजा शुभ मुहूर्तात केल्याने त्याचा व्यक्तीला विलक्षण फायदा होतो. धनात देखील अपार वाढ होते.

Dhanteras 2024 Date : दिवाळी सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून (Dhanteras 2024) होते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक धन्वंतरी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करतात, समृद्धी आणि सुख-संपत्तीसाठी प्रार्थना करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी अनेकजण सोन्याचे दागिने, चांदीची नाणी यासह अनेक नवीन वस्तू खरेदी करतात. यंदा धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला आली आहे. या दिवशी धन पूजनाचा शुभ मुहूर्त नेमका कोणता? जाणून घेऊया.

यंदा धनत्रयोदशी नेमकी कधी? (Dhanteras 2024 Date)

या वर्षी धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर 2024 रोजी, म्हणजेच मंगळवारी साजरी केली जात आहे.

धनत्रयोदशी तिथी (Dhanteras 2024 Tithi)

धनत्रयोदशी तिथीची सुरुवात 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजून 31 मिनिटांपासून होईल. ते धनत्रयोदशीची समाप्ती 30 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी होणार आहे. मात्र उदयतिथीनुसार, धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला साजरी केली जाईल.

धनत्रयोदशी पूजा शुभ मुहूर्त  (Dhanteras 2024 Shubh Muhurta)

धनत्रयोदशीचा मुहूर्त हा विधी आणि पूजा करण्यासाठी एक महत्त्वाचा काळ मानला जातो. पंचांगानुसार, यंदा पूजेचा शुभ मुहूर्त 29 ऑक्टोबरला संध्याकाळी 7:04 ते 8:27 पर्यंत असेल, अशात तुम्हाला  पूजा करण्यासाठी सुमारे 1 तास 23 मिनिटांचा वेळ मिळेल.

प्रदोष काळ: संध्याकाळी 6:01 वाजेपासून ते रात्री 8:27 पर्यंत
वृषभ काळ: संध्याकाळी 7:04 ते रात्री 9:08 पर्यंत
त्रयोदशी तिथी प्रारंभ: 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:31 पर्यंत
त्रयोदशी तिथी समाप्त: 30 ऑक्टोबर 2024 दुपारी 1:15 पर्यंत

धनत्रयोदशी पूजा विधी (Dhanteras Puja Vidhi)

धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यासाठी पाटावर देवी लक्ष्मी आणि कुबेराचा फोटो ठेवावा. कुबेर देव आणि धन्वंतरि देवाची पूजा करावी. नंतर तुपाचा दिवा लावावा आणि संध्याकाळी दाराजवळ दिवे लावावे. घरातील दागदागिने, पैसे तिजोरीतून बाहेर काढून त्याची पूजा करावी आणि पुन्हा तिजोरीत ठेवून द्यावे. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवाला पिवळी मिठाई अर्पण करा. यानंतर मंत्रोच्चार करुन आरती करा. धनत्रयोदशीच्या दिवशी नव्या कपड्यांची आणि दागिन्यांची खरेदी करणं शुभ समजलं जातं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Dhanteras 2024 : धनत्रयोदशीला 'या' 7 वस्तू खरेदी कराल, तर घरात येईल दारिद्र्य

Dhanteras 2024 Wishes : धनत्रयोदशीनिमित्त मित्र-परिवाराला द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज                                                                   

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: उद्यापासून जूनचा सर्वात पॉवरफुल आठवडा सुरू! 6 राशींचं नशीब पालटणार! अमावस्येसह ग्रहांचे अद्भूत राजयोग, साप्ताहिक राशीभविष्य
उद्यापासून जूनचा सर्वात पॉवरफुल आठवडा सुरू! 6 राशींचं नशीब पालटणार! अमावस्येसह ग्रहांचे अद्भूत राजयोग, साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 14 June 2026 : आज रविवारचा दिवस 7 राशींवर पडणार भारी, दिवसाच्या शेवटी भूतकाळाचं सत्य येणार समोर; वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 7 राशींवर पडणार भारी, दिवसाच्या शेवटी भूतकाळाचं सत्य येणार समोर; वाचा आजचे राशीभविष्य
Adhik Maas Amavasya: आजपासून अधिक मास अमावस्या सुरू! पॉवरफुल त्रिग्रही योगामुळे 5 राशी मालामाल, उत्पन्नाचे नवे मार्ग, तिथी, महत्त्व जाणून घ्या...
आजपासून अधिक मास अमावस्या सुरू! पॉवरफुल त्रिग्रही योगामुळे 5 राशी मालामाल, उत्पन्नाचे नवे मार्ग, तिथी, महत्त्व जाणून घ्या...
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस...डबल लाभ.. 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! पॉवरफुल बुधादित्य राजयोग, कोणाला मालामाल करणार? पैसा, नोकरी, प्रेम...
पुढचे 7 दिवस...डबल लाभ.. 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! पॉवरफुल बुधादित्य राजयोग, कोणाला मालामाल करणार? पैसा, नोकरी, प्रेम...

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
Rohit Pawar Protest : रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी....',
रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय',
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
Embed widget