एक्स्प्लोर

Maharashtra CM Oath Ceremony : फडणवीसांच्या शपथविधीसाठी 'हाच' मुहूर्त का निवडला? जाणून घ्या ज्योतिष शास्त्रानुसार या मुहूर्ताचं महत्त्व

Maharashtra CM Oath Ceremony : आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडतोय. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

Maharashtra CM Oath Ceremony : आज महाराष्ट्र सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईच्या (Mumbai) आझाद मैदानावर (Azad Maidan) पार पडणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारला स्पष्टच बहुमत मिळालं. मात्र, तरीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन पक्षातच बरीच खलबतं होत होती. अखेर आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडतोय. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री असतील. तसेच, देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. मात्र, या शपथविधीसाठी शुभ मुहूर्त नेमका कोणात असणार या संदर्भात नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास आणि छत्रपती संभाजीनगरमधील ज्योतिष अनंत पांडव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. 

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा शुभ मुहूर्त 

महायुती सरकारचा शपथविधी आज संध्याकाळी 05:30 वाजता होणार आहे. या संदर्भात नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 05 डिसेंबर रोजी 05 वाजू 57 मिनिटांनी श्रवण नक्षत्र मुहूर्त लागणार आहे. याचं वृषभ लग्न नावाचं जे स्थिर लग्न आहे आणि ध्रुव नावाचा योग या ठिकाणी निर्माण झाला आहे. ज्याप्रमाणे ध्रुवतारा अढळ आहे. त्याप्रमाणे 5 वर्ष हे सरकार अढळ राहील. कोणत्याच पद्धतीचे वादविवाद होणार नाही. क्लेषात्मक भूमिका मांडल्या जाणार नाहीत. तसेच, निर्विघ्नपणे हे सरकार चालेल. असं पाच वाजून 57 मिनिटांच्या कुंडलीचं हे वैशिष्ट्य आहे. 

ज्योतिषाचार्य अनंत पांडव यांच्या मते, 5 तारखेला साधारण साडेचारनंतर स्थिर लग्न आरंभ होत आहे. त्याचप्रमाणे 5 नंतर शपथविधीला आरंभ होणार आहे. स्थिर लग्नाचा कालावधी हा काळ साडेसहा वाजेपर्यत असणार आहे. त्यामुळे हा काळ अत्यंत शुब आहे. कारण स्थिर लग्नावर केलेलं कोणतंही कार्य अत्यंत स्थिर आणि चिरकाल टिकणारं ठरतं. त्यामुळे या स्थिर लग्नावरतीच हा शपथविधी निश्चित झालेला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या कुंडलीनुसार, वृषभ लग्न अत्यंत शुभकारक मानलं जात आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या कुंडलीनुसार, वृषभ आणि शुक्र हे एकमेकांच्या मैत्री भावात आहेत. त्यामुळे हा काळ दोघांसाठी चांगला असणार आहे. 

पाहा व्हिडीओ : 

हे ही वाचा :                 

Devendra Fadnavis : देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget