(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New Year 2024 : डिसेंबरमध्ये ग्रह पालटणार; 'या' 4 राशींच्या जीवनावर होणार परिणाम, व्हा सतर्क
December Grah Gohcar 2023 : डिसेंबरमध्ये 5 ग्रह बदलणार आहेत. डिसेंबरमध्ये होणारा ग्रहांचा हा बदल 2024 च्या सुरुवातीलाही 4 राशींच्या लोकांवर परिणाम करणारा ठरेल.
New Year 2024: डिसेंबरमध्ये 5 ग्रह मार्गक्रमण करणार आहेत. डिसेंबर महिन्यात सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ या ग्रहांचं भ्रमण होईल. तर ग्रहांचा राजा गुरू हा थेट मेष राशीत प्रवेश करेल. डिसेंबरमध्ये सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. यासोबतच बुधही धनु राशीत मार्गक्रमण करणार आहे. मंगळाचंही धनु राशीत भ्रमण होईल.
डिसेंबर महिन्यात धनु राशीचा त्रिग्रही योग तयार होत आहे. धनु राशीमध्ये बुध आणि सूर्य एकत्र आल्याने बुधादित्य राजयोग निर्माण होईल. तसेच धनु राशीत सूर्य आणि मंगळाच्या भ्रमणामुळे आदित्य मंगल राजयोग तयार होईल. त्याच वेळी गुरू 31 डिसेंबरला थेट मेष राशीत जाईल. डिसेंबरमध्ये बदलणाऱ्या ग्रहांच्या या हालचालीचा 2024 मध्ये सर्व राशींवर परिणाम होईल. 2024 मध्ये 4 राशींसाठी (Zodiac Signs) ग्रहांची ही स्थिती थोडी त्रासदायक असेल.
कर्क रास (Cancer)
डिसेंबर महिन्यात सूर्यावर शनीची विशेष दृष्टी असणार आहे. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांना व्यवसायात अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमची प्रकृतीही थोडी कमजोर राहू शकते. कुटुंबातही काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. तथापि, या काळात उच्च प्रतिष्ठित लोकांशी तुमचा संवाद वाढेल.
कन्या रास (Virgo)
डिसेंबरमध्ये ग्रहांच्या संक्रमणामुळे कन्या राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन थोडे विस्कळीत राहू शकते. याव्यतिरिक्त, घरगुती जीवनात काही प्रकरणांमुळे तणाव असू शकतो. व्यवसायात तुम्हाला अनेक विवादित परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुम्ही तुमच्या बजेटची विशेष काळजी घ्या. या काळात तुम्ही कुठेतरी प्रवासाची योजना देखील बनवू शकता.
वृश्चिक रास (Scorpio)
डिसेंबरमध्ये होणार्या ग्रहांच्या संक्रमणामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमचे मन कोणत्याही कामात नीट एकाग्र होऊ शकणार नाही, ज्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमचे शंभर टक्के देऊ शकणार नाही. तुमच्यावर कामाचा ताण जास्त असेल. तुम्हाला कमी आराम मिळेल आणि जास्त धावपळ करावी लागेल. तुम्ही वाद टाळावा. तुमच्या नियोजित योजनांमध्ये तुम्हाला अंशतः यश मिळेल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांना या काळात अनेक विरोधाभासी परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पण, त्यावर उपायही येत राहतील. पालकांशी काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. काही बाबींबाबत त्यांच्याशी वैचारिक मतभेदही असू शकतात. तसेच, तुमच्या चुकांमुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :