एक्स्प्लोर

Datta Jayanti 2024: दत्तप्रभूंच्या 'या' मंदिरासमोर जेव्हा आदिलशाह बादशाह सुद्धा नतमस्तक झाला! ज्या ठिकाणाला दत्तप्रभूंची राजधानी म्हटलं जातं, जाणून घ्या..

Datta Jayanti 2024: नरसोबाच्या वाडीतील दत्तप्रभूंच्या मंदिरावर कळस नाही. काय आहे कारण? दत्तजयंतीच्या दिवशी या मंदिराची खासियत जाणून घ्या..

Datta Jayanti 2024: महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आणि याच भूमीवर अनेक देवी-देवतांच्या स्पर्श झाल्याने तिला पावन भूमी म्हटले जाते. आज दत्तजयंती निमित्ताने आपण एका अशा तीर्थक्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याच्यापुढे खुद्द आदिलशाह बादशाह सुद्धा नतमस्तक झाला. ते ठिकाण म्हणजे दत्तात्रेयांचे अवतार श्रीनृसिंह सरस्वतीं स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्री नृसिंहवाडी आहे. हे ठिकाण कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यात नरसोबाची वाडी म्हणूनही प्रचलित आहे. जाणून घेऊया या ठिकाणाबद्दल..

दत्तप्रभूंची राजधानी

दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्रीनृसिंह सरस्वतींचे या ठिकाणी 12 वर्षे वास्तव्य होते असे सांगितले जाते. श्रीनृसिंह सरस्वतींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि त्यांच्याबद्दलचे अनेक चमत्कार इथे घडल्याचे सांगितले जाते. दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते, अशा या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले..


Datta Jayanti 2024: दत्तप्रभूंच्या 'या' मंदिरासमोर जेव्हा आदिलशाह बादशाह सुद्धा नतमस्तक झाला! ज्या ठिकाणाला दत्तप्रभूंची राजधानी म्हटलं जातं, जाणून घ्या..

आदिलशहाने इथे केला नवस! बांधले नरसोबा वाडीचे मंदिर

ऐतिहासिक माहितीनुसार, नरसोबा वाडीचे हे मंदिर विजापूरच्या आदिलशहाने बांधले आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले. तेव्हा बिदरच्या बादशाहच्या सांगण्यावरून आदिलशाह नृसिंहवाडीस आला. त्याने गुरूंचे दर्शन घेतले आणि नवस बोलला. पुजार्‍याने जो अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळयाला लावला असता, तिला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे बादशहा आनंदित झाला. त्याने कृष्णा नदीवरील औरवाड आणि गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिली, अशी नोंद आढळते. 
Datta Jayanti 2024: दत्तप्रभूंच्या 'या' मंदिरासमोर जेव्हा आदिलशाह बादशाह सुद्धा नतमस्तक झाला! ज्या ठिकाणाला दत्तप्रभूंची राजधानी म्हटलं जातं, जाणून घ्या..

मंदिरावर कळस नाही?

नरसोबाच्या वाडीचे मंदिर विजापूरच्या मुसलमान बादशहाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही. हे मंदिर म्हणजे एक लांबट आकाराची उंच अशी वास्तू आहे आणि त्यासमोरच संथ वाहणाऱ्या कृष्णेचा विस्तीर्ण घाट आहे. नरसोबाच्या वाडीचा उल्लेख अमरापूर या नावाने गुरुचरित्रात आला आहे. त्यामुळे हे ठिकाण दत्तभक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानतात. इथे नृसिंह सरस्वतीच्या मंदिराव्यतिरिक्त रामचंद्र योगी यांचीही समाधी आहे.

नृसिंहसरस्वतींची तब्बल 12 वर्षे तपश्चर्या

1378 मध्ये कारंजा येथे नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. 1388 मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्यादरम्यान 1421 साली त्यांचा मुक्काम औंदुबरी क्षेत्री होता, तर 1422 मध्ये कृष्णा पंचगंगा संगमानजीकच्या गावात होता. नृसिंहसरस्वतींनी येथे तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली. या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर 1434 मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली. आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तांना दिली, ज्यानंतर गाणगापुरी प्रस्थान ठेवले.


Datta Jayanti 2024: दत्तप्रभूंच्या 'या' मंदिरासमोर जेव्हा आदिलशाह बादशाह सुद्धा नतमस्तक झाला! ज्या ठिकाणाला दत्तप्रभूंची राजधानी म्हटलं जातं, जाणून घ्या..

दत्तपादुका ज्या कधीही झिजत नाही?

कृष्णा नदीच्या घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली मंदिर आहे. मंदिरातच नृसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत. म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात. पादुकांची पूजाअर्चा येथे अखंड सुरू असते.

मनोहर पादुका, मंदिराची खासियत

यानंतर जेव्हा नृसिंहसरस्वती गाणगापूरला जायला निघाले, तेव्हा योगिनींच्या आग्रहावरून त्यांनी आपल्या पादुका इथे ठेवल्या. या वालुकामय पाषाणाच्या पादुकांना 'मनोहर पादुका' असे नाव आहे. या मनोहर पादुकांची मध्यान्ही पूजा केली जाते. मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूंला उंच व विस्तृत खांब आहेत. मधोमध श्रीगुरू ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णा नदीसन्मुख त्या मनोहर पादुका आहेत. या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे. पादुका ज्या सभागृहात आहेत त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढविला आहे. मधोमध गणेशपट्टी, त्यावर आजूबाजूला मयूर व जय-विजय आणि त्यांच्या वरील बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा आहे. त्यांच्या एका बाजूला स्वयंभू श्री गणेशाची भव्य मूर्ती असून तिचीही पूजा होते. (Source - Heydeva.com)

हेही वाचा>>>

Garud Puran: प्रत्येक घरात मुली का जन्म घेत नाहीत? श्रीकृष्णांनी महाभारतात काय म्हटलंय? जाणून घ्या

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 11 April 2026: आज 11 एप्रिलचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने आयुष्याचं चांगभलं, आजचे राशीभविष्य
आज 11 एप्रिलचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने आयुष्याचं चांगभलं, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 11 एप्रिलचा दिवस ठरणार भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनवर्षाव
11 एप्रिलचा दिवस ठरणार भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनवर्षाव
Shani Vakri 2026 : दिवाळीच्या आधीच 3 राशींना लागणार जॅकपॉट; शनिच्या वक्री चालीने पुढचे 138 दिवस सुखाचे, धनसंपत्तीत भरभराट
दिवाळीच्या आधीच 3 राशींना लागणार जॅकपॉट; शनिच्या वक्री चालीने पुढचे 138 दिवस सुखाचे, धनसंपत्तीत भरभराट
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींसाठी एप्रिलचा तिसरा आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींसाठी एप्रिलचा तिसरा आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Embed widget