Crystal Tree Benefits : घर-ऑफिसमध्ये 'असे' ठेवा क्रिस्टल ट्री, तुमच्याकडे येईल पैसाच पैसा!
Crystal Tree Benefits : फेंगशुईमध्ये अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरात ठेवल्याने पैशाच्या समस्या दूर होतात.
Crystal Tree Benefits : फेंगशुईमध्ये अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरात ठेवल्याने पैशाच्या समस्या दूर होतात. पैसा झाडांना लागत नाही. हे वाक्य आपण आपल्या मोठ्यांकडून अनेकदा ऐकले आहे. पण असे एक झाड आहे, ज्याला घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवून पैशांचा वर्षाव केला जाऊ शकतो. असे म्हटले जाते की घरात स्फटिकाचे झाड म्हणजेच क्रिस्टल ट्री ठेवल्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल होतात.
क्रिस्टल ट्री ठेवण्याचे काय चमत्कारिक फायदे होतात ते जाणून घेऊया.
बेडरूम
लिव्हिंग रूम किंवा बेडरूमच्या नैऋत्य दिशेला क्रिस्टलचे झाड लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे वैवाहिक जीवन मधुर राहते. घरातील सुख-शांती भंग पावत नाही आणि सौभाग्य प्राप्त होते.
अभ्यासिका
फेंगशुईनुसार विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्टडी रूम किंवा स्टडी टेबलच्या ईशान्य कोपर्यात क्रिस्टलचे झाड ठेवावे. त्यामुळे अभ्यासात एकाग्रता राहते, मन विचलित होत नाही आणि सकारात्मक परिणाम दिसून येतात.
'या' दिशेने फलदायी
जर पैशाची कमतरता असेल, कर्जाची समस्या असेल तर घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला स्फटिकाचे झाड ठेवणे शुभ असते. याने आर्थिक समस्या तर दूर होतातच पण करिअर आणि व्यवसायातही प्रगती होते.
ऑफिसमध्ये
जर तुम्हाला आजारांपासून मुक्ती मिळवायची असेल तर घर किंवा ऑफिसच्या पूर्व दिशेला स्फटिकाचे झाड ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते. कारण घराचा पूर्व भाग हा आरोग्याशी संबंधित असतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :
- Numerology : 'या' तारखांना जन्मलेले लोक स्वभावाने श्रीमंत आणि अहंकारी असतात
- Samudra Shastra : ओठ सांगतात एखाद्या व्यक्तीचे नशीब आणि स्वभाव, कसे ते जाणून घ्या
- Chanakya Niti For Love : प्रेम जीवनातही कधीच अयशस्वी होत नाहीत ‘अशा’ व्यक्ती! जोडीदारात ‘हे’ गुण महत्त्वाचे...