Chaturmas 2022, Horoscope : हिंदू धर्मात चार्तुमासाचे विशेष धार्मिक महत्त्व सांगण्यात आले आहे. पंचांगनुसार, 10 जुलै 2022 पासून याची सुरुवात झाली आहे. श्रावण हा पवित्र महिना चार्तुमासात येतो. मान्यतेनुसार उपासना, साधना आणि भगवंताचे स्मरण करण्यासाठी चार्तुमास हा सर्वोत्तम मानला जातो. हा महिना वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला जातो. पावसाळा 4 महिने टिकतो. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका असतो. यामुळेच चार्तुमासात एकाच ठिकाणी राहून साधना करण्याचा सल्ला दिला जातो. चार्तुमास 'या' राशींसाठी कसा आहे, जाणून घेऊया राशीभविष्य...


मेष -  या चार्तुमासात तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. या काळात एखाद्या आजारामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारावी लागेल. वैवाहिक जीवनात तणाव आणि मतभेद होऊ शकतात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.


मिथुन - चार्तुमास प्रारंभाच्या दोन दिवसांनंतरच तुमच्या राशीवर शनिची ढैय्या आली आहे. त्यामुळे विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. पैशाच्या बाबतीत मोठा निर्णय सावधानतेने घ्या. अन्यथा नुकसान होऊ शकते. ऑफिसमध्येही काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.


तूळ - तूळ राशीच्या लोकांनी चातुर्मासात आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. जर तुम्हाला कोणताही जुना आजार असेल तर तो गांभीर्याने घ्या. जोडीदारापासून अंतर वाढू शकते. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल नाराजीचाही सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा.


धनु - चार्तुमासात तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांबाबत काळजी घ्यावी लागेल. ऑफिसपासून घरापर्यंत स्वत:ला सिद्ध करावं लागेल. स्वतःच्या चुका ओळखून त्या दूर करण्याची हीच वेळ आहे. यावेळी तुम्हाला योग्य आणि अयोग्य यातील फरक सहज समजेल. हा काळ खूप काही शिकवून जाईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


हेही वाचा :