एक्स्प्लोर

Surya Grahan 2025 : नव्या वर्षात सूर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहण नेमकं कधी लागणार? जाणून घ्या अचूक तारीख आणि सूतक काळ

Chandra Grahan And Surya Grahan Date 2025 : नवीन वर्ष 2025 मध्ये 4 ग्रहण लागणार आहेत. यामध्ये 2 सूर्य ग्रहण तर, 2 चंद्र ग्रहण असतील. तसेच, वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण लवकरच लागणार आहे. 

Chandra Grahan And Surya Grahan Date 2025 : हिंदू धर्मानुसार, सूर्य ग्रहण (Surya Grahan) आणि चंद्र ग्रहणाला (Chandra Grahan) अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की, जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा नकारात्मकता वाढते. त्यामुळे या दरम्यान पूजा किंवा कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. त्यानुसार, नवीन वर्ष 2025 मध्येही 4 ग्रहण लागणार आहेत. यामध्ये 2 सूर्य ग्रहण तर, 2 चंद्र ग्रहण असतील. तसेच, वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण लवकरच लागणार आहे. 

2025 वर्षातील पहिलं सूर्य ग्रहण (Surya Grahan 2025)

ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 वर्षातील पहिलं सूर्य ग्रहण 29 मार्च रोजी शनिवारी लागणार आहे. हे सूर्य ग्रहण चैत्र शुक्ल पक्षाच्या अमावस्येला लागणार आहे. मात्र, हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतीयांसाठी सुतक काळ लागणार नाही. हे ग्रहण उत्तर अमेरिका, ग्रीनलॅंड, उत्तर अटलांटिका महासागर तसेच, युरोप या देशांत दिसणार आहे. 

2025 वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण (Chandra Grahan 2025)

ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण 14 मार्च रोजी शुक्रवारी फाल्गुन पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी लागणार आहे. या दिवशीच होलिका दहन होणार आहे. हे ग्रहण सकाळी 10 वाजून 39 मिनिटांनी सुरु होणार आहे. हे ग्रहण दुपारी 2 वाजून 18 मिनिटांनी संपेल. मात्र, भारतात हे चंद्र ग्रहण दिसणार नाही. त्यामुळे भारताला सूतक काळ लागणार नाही. 

सूर्यग्रहणाच्या वेळी 'ही' कामे अजिबात करु नका

धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा सूर्यग्रहण लागते तेव्हा ते कधीच उघड्या डोळ्यांनी बघू नये. कारण यामुळे तुमच्या डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. तसेच, या दिवशी घराबाहेर पडू नका. तसेच, भोजन आणि पाण्याचं सेवन करु नका. या दरम्यान डोक्यावरचे केस आणि नखं कापणं वर्जित मानलं जातं. हे नियम वृद्ध, आजारी आणि लहान मुलं सोडून सर्वांवर लागू आहेत. तसेच, या कालावधीत श्राद्ध देखील करु नये.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                                                            

Shani Asta 2025 : फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी शनीचा होणार अस्त; 'या' 4 राशींवर पुढचे 40 दिवस सतत असणार टांगती तलवार

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: नारळाला देवीचे रूप देऊन सजवणे योग्य की अयोग्य? नारळ सजवताना काय काळजी घ्याल? धार्मिक महत्त्व, श्रद्धा आणि परंपरा...
नारळाला देवीचे रूप देऊन सजवणे योग्य की अयोग्य? नारळ सजवताना काय काळजी घ्याल? धार्मिक महत्त्व, श्रद्धा आणि परंपरा...
Lakshmi Narayan Rajyog 2026: पुढच्या 5 दिवसांत 4 राशींवर देवी महालक्ष्मी करणार कृपावर्षाव, लक्ष्मी नारायण राजयोगाचा महासंयोग! अचानक धनलाभ, करिअरमध्ये मोठी झेप..
पुढच्या 5 दिवसांत 4 राशींवर देवी महालक्ष्मी करणार कृपावर्षाव, लक्ष्मी नारायण राजयोगाचा महासंयोग! अचानक धनलाभ, करिअरमध्ये मोठी झेप..
November Horoscope 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...नोव्हेंबरचा शेवटचा टप्पा गेमचेंजर! 5 राशींच्या भाग्योदयाचा काळ सुरू, पैसा, नोकरी... राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...नोव्हेंबरचा शेवटचा टप्पा गेमचेंजर! 5 राशींच्या भाग्योदयाचा काळ सुरू, पैसा, नोकरी... राशीभविष्य..
Shankar Maharaj Prakat Din 2026: शिकार करायला गेले अन् मिळाली गुरुकृपेची दिशा! शंकर महाराज स्वामींचे लाडके शिष्य कसे बनले? प्रकट दिनानिमित्त जाणून घ्या..
शिकार करायला गेले अन् मिळाली गुरुकृपेची दिशा! शंकर महाराज स्वामींचे लाडके शिष्य कसे बनले? प्रकट दिनानिमित्त जाणून घ्या..

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti Solapur News: वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
Pune Crime News: पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पत्रकार परिषदेनंतर सत्यजीत तांबेंकडून मित्रत्वाचा सल्ला, पण कमेंट बंद; रोहित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
पत्रकार परिषदेनंतर सत्यजीत तांबेंकडून मित्रत्वाचा सल्ला, पण कमेंट बंद; रोहित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
रोहित पवारांच्या कारखान्यातील धुरामुळे अपघात; नवनाथ बन यांनी सांगितलेला कारखाना विमानतळापासून किती लांब?
रोहित पवारांच्या कारखान्यातील धुरामुळे अपघात; नवनाथ बन यांनी सांगितलेला कारखाना विमानतळापासून किती लांब?
Supriya Sule On Rohit Pawar: रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Rohit Pawar and Satyajeet Tambe: आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
Maharashtra Cabinet decisions: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय, पालघर जिल्ह्याचा झोन-4 काढून झोन- 1 मध्ये समावेश, चंद्रकांत पाटलांच्या खात्याबाबत महत्त्वाची घडामोड
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय, पालघर जिल्ह्याचा झोन-4 काढून झोन- 1 मध्ये समावेश, चंद्रकांत पाटलांच्या खात्याबाबत महत्त्वाची घडामोड
Rohit Pawar and Prasad Lad: आम्ही रोहित पवारांचा रस्त्यावर दिसतील तिथे कार्यक्रम करु, फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजपचा नेता आक्रमक; शरद पवार-सुप्रिया सुळेंनाही म्हणाला...
आम्ही रोहित पवारांचा रस्त्यावर दिसतील तिथे कार्यक्रम करु, फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजपचा नेता आक्रमक; शरद पवार-सुप्रिया सुळेंनाही म्हणाला...
Embed widget