Chanakya Niti : स्त्री असो वा पुरुष, 'या' एका गोष्टीशी कधीही तडजोड करू नका, आयुष्य होईल कठीण!
Chanakya Niti : चाणक्य हे ज्ञानाचे भांडार आहे. आचार्य त्यांच्या जीवनातील प्रत्येक उद्दिष्ट त्यांच्या धोरणामुळे पूर्ण करायचे.
Chanakya Niti : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे केवळ भारताचे महान अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी नव्हते. आपल्या धोरणांच्या बळावर त्यांनी चंद्रगुप्त मौर्य या सामान्य बालकाला संपूर्ण भारताचा सम्राट बनवले होते. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे केवळ राज्यकारभारासाठीच नव्हे तर आजही मानवी जीवनात अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीती शास्त्रामध्ये (Chanakya Niti) स्त्री असो वा पुरुष, या एका गोष्टीशी कधीही तडजोड न करण्याबाबत सांगितले आहे.
चाणक्य हे ज्ञानाचे भांडार
चाणक्या हे ज्ञानाचे भांडार आहे. आचार्य जीवनातील प्रत्येक उद्दिष्ट त्यांच्या धोरणामुळे पूर्ण करायचे. त्यांच्या धोरणांमुळे अनेकांचे जीवन बदलले. चाणक्य म्हणतात की, माणसाच्या कृती हाच त्याच्या यशाचा आणि अपयशाचा आधार असतो. प्रतिष्ठा मिळवायला वर्षे लागतात, पण माणसाची एक चूक त्याला जमिनीवर आणू शकते. चाणक्यांनी सांगितले आहे की, अशी कोणती गोष्ट आहे जिच्याशी कधीही तडजोड करू नये, कितीही वाईट परिस्थिती आली तरी ही एक गोष्ट पणाला लावली तर नाती, आदर आणि सर्व काही नष्ट होईल. वर्षानुवर्षे कष्ट करून सन्मान मिळवला, आयुष्यासाठी एक काळा डाग असेल. अशी कोणती गोष्ट आहे ती?
स्वाभिमानाशी तडजोड करणे चूक नाही, तर ते पाप आहे - चाणक्य
माणसाचे आयुष्यभराचे भांडवल
स्वाभिमान हे माणसाचे आयुष्यभराचे भांडवल आहे, जे तो मरेपर्यंत जपतो. चाणक्य म्हणतात की, जिथे तुमचा स्वाभिमान दुखावला जात असेल, तर तिथे झुकण्याची गरज नाही. आपलं अस्तित्व पणाला लावलं तर प्रतिमेवर पडणारा डाग पुसला तरी दूर करता येणार नाही. उदाहरणार्थ, ताटात चार ऐवजी दोन भाकरी असल्या तरी ती मानाची असावी असे त्यांनी म्हटले आहे. जीवनात अशी कोणतीही गोष्ट नाही, ज्यासाठी स्वाभिमानाशी तडजोड करावी लागेल.
तुमचा स्वाभिमान असाच ठेवा
चाणक्य म्हणतात की, जो व्यक्ती आपल्या स्वाभिमानावर ठाम राहतो, त्याचे दुःख त्याच्यापासून दूर राहतात. स्वाभिमानाशी तडजोड करून जीवन जगणे नेहमीच वेदनादायक असते. जेव्हा एखादी व्यक्ती मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असते. तेव्हा आत्म-सन्मानाशी तडजोड करण्याची गरज अनेकदा येते. स्वाभिमान उच्च ठेवायचा असेल तर स्वावलंबी व्हावे लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या
Chanakya Niti : असे कर्मचारी ऑफिसमध्ये सगळ्यांना प्रिय असतात, कोणतीही समस्या क्षणार्धात सोडवतात, चाणक्य म्हणतात..