Chanakya Niti: पुरुषांनो, लग्नानंतर 'या' चुका टाळाच, पत्नीसह सगळं गमावून बसाल, नातं तुटण्यापूर्वी आधीच सावरा स्वत:ला...
Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार जाणून घेऊया, विवाहित लोकांनी लग्नानंतर काही चुका टाळल्या पाहिजेत. विशेषत: पती आपल्या पत्नीसोबत कसे वागतात, हे नातं टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

Chanakya Niti: विवाह हा व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. पती-पत्नी हे एकमेकांच्या आयुष्याचे बरोबरीचे जोडीदार असतात. हे दोघेही एकमेकांच्या सुख-दु:खात साथ देतात. त्यांच्या संसाराच्या गाडीचं एकही चाक डगमगलं तर त्यांचं आयुष्य उद्धवस्त व्हायला थोडाही वेळ लागत नाही. अशात काही पुरूष असे असतात, जे पत्नीला योग्य वागणूक देत नाही, किंवा पत्नीदेखील काही अशा चुका करून बसतात. जे त्यांच्या नात्यासाठी अत्यंत हानीकारक मानले जाते. चाणक्यनीतीत विवाह आणि पती-पत्नीच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर पुरुषांनी काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर हे बदल दोघांच्या नात्यात दरी निर्माण करू शकतात. चाणक्यनीतीनुसार, लग्नानंतर चुकूनही पुरुषाने कोणती चूक करू नये हे जाणून घेऊया.
नातं तुटण्यापूर्वी आधीच सावरा स्वत:ला...
आचार्य चाणक्य हे भारताचे एक महान तत्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतीकार होते. त्यांची धोरणे आजही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लोकांना मार्गदर्शन करतात. चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जाणून घेऊया..
पत्नीची तुलना
आचार्य चाणक्य यांच्या मते, पुरुषांनी त्यांच्या पत्नीची तुलना इतर कोणाशीही करू नये कारण तुलना केल्याने नाते कमकुवत होते आणि दुसऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास दुखावतो.
पत्नीला वेळ, प्रेम आणि आदर
लग्नानंतर, पुरूष अनेकदा त्यांच्या कामात इतके व्यस्त होतात की ते त्यांच्या पत्नीला वेळ, प्रेम आणि आदर द्यायला विसरतात. हे करू नये, कारण जो पुरुष आपल्या पत्नीला वेळ देत नाही, त्याच्या आयुष्यात स्थिरता नसते.
घरातील गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला सांगू नका
चाणक्यनीतीनुसार, घरातील गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला सांगणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. विशेषतः पत्नीशी संबंधित गोष्टी दुसऱ्याला सांगणे हे नात्याचा पाया कमकुवत करते.
स्वाभिमान दुखवू नका
चाणक्य म्हणतात की कधीही स्त्रीचा स्वाभिमान दुखवू नका कारण यामुळे तुमची पत्नी मानसिकदृष्ट्या तुटते, ज्याचा परिणाम तुमच्या नात्यावरही दिसू लागेल.
दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होऊ नका
चाणक्यनीतीनुसार, पत्नी जिवंत असताना दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होणाऱ्या पुरुषाचा नाश निश्चित आहे. अशा व्यक्तीला ना आदर असतो ना आनंद.
हेही वाचा :
Numerology: ऑगस्टची सुरूवात होताच 'या' जन्मतारखेच्या लोकांचे 'अच्छे दिन' सुरू, बॅंक बॅलेन्स वाढणार, करिअरला मिळणार दिशा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















