Budhwa Mangal 2024 : जून महिन्यातील तिसरा 'मोठा मंगळ'; धनप्राप्तीसाठी करा 'हा' खास उपाय; आयुष्यातील सर्व अडथळे होतील दूर
Budhwa Mangal 2024 : ज्येष्ठ महिन्यातील प्रत्येक मंगळवार फार खास मानला जातो. मान्यतेनुसार, तुम्ही या दिवशी काही खास उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात सुक-समृद्धी येते.
Budhwa Mangal 2024 : आज 11 जून ज्येष्ठ महिन्याचा तिसरा मोठा मंगळ आहे. मोठा मंगळला बुधवा मंगळ असं सुद्धा म्हटलं जातं. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान हनुमान (Lord Hanuman) ज्येष्ठ महिन्याच्या मंगळवारी प्रभू श्रीरामांना भेटले अशी मान्यता आहे. याच कारणामुळे ज्येष्ठ महिन्यातील प्रत्येक मंगळवार फार खास मानला जातो. मान्यतेनुसार, तुम्ही या दिवशी काही खास उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात सुक-समृद्धी येते. या दिवशी कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या.
आजच्या दिवशी मातीच्या भांड्याचे दान केल्याने मंगळचा नकारात्मक प्रभाव पडतो
ज्या लोकांवर मंगळाचा नकारात्मक प्रभाव सुरु आहे. अशा लोकांनी मंगळवारच्या दिवशी काही उपाय नक्की करावेत. मोठा मंगळवारच्या दिवशी मातीच्या वस्तूंचं दान करणं फार शुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रात, मंगळ ग्रहाला फार उष्ण ग्रह मानला जातो. त्यामुळे या दिवशी शीत वस्तू दान केल्याने मंगळाचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर होतो. तसेच, यामुळे मंगळ दोषापासून देखील मुक्ती मिळते.
धनप्राप्तीसाठी आजच्या दिवशी करा 'हे' उपाय
प्रत्येकाला आयुष्यात कधीना कधी आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. किंवा जास्त मेहनत करून देखील पुरेसा पैसा मिळत नाही. त्यामुळे तुमची आर्थिक तंगी दूर करण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. आजच्या दिवशी तुम्ही संकटमोचक हनुमानाला पानावर 11 सुपारी ठेवल्याने धनप्राप्ती होईल. तसेच, यामुळे तुमची आर्थिक समस्यांपासून सुटका होईल. तसेच, अनेक दिवसांपासून तुमच्यामागे सुरु असलेली साडेसातीही हे उपाय केल्याने दूर होईल.
शत्रूंपासून बचाव करण्यासाठी मोठा मंगळाच्या दिवशी करा 'हा' उपाय
आपल्या आयुष्यात काही लोक आपल्यावर आपल्या कामावर फार मत्सर भाव ठेवतात. अनेकदा यामुळे आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम दिसून येतो. या सर्व समस्यांवर मुक्ती मिळविण्यासाठी मोठा मंगळवारच्या दिवशी भगवान हनुमानाला चमेलीचं तेल, शेंदूर अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला पुण्य मिळेल. तसेच, तुमच्या कामातही चांगले बदल तुम्हाला दिसतील. तसेच, या काळात धार्मिक स्थळाला भेट दिल्याने तुम्हाला काही दिवसांतच याचे शुभ परिणाम दिसतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: