एक्स्प्लोर

Budh Vakri 2023 : डिसेंबरचे 15 दिवस 'या' राशीच्या लोकांवर पडणार भारी; बुधची उलटी चाल करणार नुकसान

Budh Vakri 2023 in Dhanu: पैसा, व्यवसाय, वाणी आणि संवाद यासाठी जबाबदार असलेला बुध ग्रह डिसेंबर महिन्यात उलटी चाल चालणार आहे. सुमारे 15 दिवस, बुध ग्रह धनु राशीमध्ये उलटा फिरेल, यामुळे 3 राशींच्या लोकांचं नुकसान होऊ शकतं.

Budh Vakri 2023 December: ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, व्यापार आणि वाणीचा दाता आहे. जेव्हा जेव्हा बुध आपली राशी बदलतो किंवा त्याच्या हालचाली बदलतो तेव्हा त्याचा परिणाम लोकांच्या करिअरवर, आर्थिक स्थितीवर होतो.

हे 15 दिवस कठीण काळाचे

डिसेंबर महिन्यात बुध ग्रहाच्या स्थितीत दोन महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्याचा सर्व राशीच्या लोकांवर मोठा प्रभाव पडेल. बुध 13 डिसेंबरला दुपारी 12:01 वाजता धनु राशीत उलटी चाल चालेल. 28 डिसेंबरपर्यंत बुध तिथेच राहील आणि त्यानंतर तो आपली राशी बदलेल. या काळात बुध काही राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम करेल. बुधाच्या उलट्या चालीमुळे काही लोकांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. या काळात कोणत्या राशीच्या (Zodiac Signs) लोकांना त्रास होईल? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

13 ते 28 डिसेंबरचा काळ मेष राशीसाठी सतर्कतेचा असणार आहे. प्रतिगामी बुध मेष राशीच्या लोकांना हानी पोहोचवू शकतो. या लोकांना भाषणाशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. तुम्ही कोणाशी तरी कडवट बोलू शकता किंवा तुमच्या म्हणण्याचा कोणी चुकीचा अर्थ लावू शकतो, त्यामुळे तुमचा वाद होऊ शकतो. नात्यात चढ-उतार येऊ शकतात. काही जुने आजार उद्भवू शकतात. प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक नुकसानही होऊ शकतं. 

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांना बुधाच्या उलट्या चालीमुळे काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेषत: विवाहित लोकांना समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. सासरच्यांशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात. या 15 दिवसांच्या काळात विचारपूर्वक बोला, अन्यथा कोणाचा गैरसमज होऊ शकतो. खर्च तुम्हाला त्रास देऊ शकतात. वडिलांच्या तब्येतीची चिंता राहील.

कर्क रास (Cancer)

बुधाची उलटी चाल कर्क राशीच्या लोकांना त्रास देईल. आजारपणामुळे त्रास होईल. शत्रूही सक्रिय राहतील, तुमच्यावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करतील. अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य कमी होऊ शकतं, ज्यामुळे तुम्ही करत असलेलं काम बिघडू शकतं. भावा-बहिणीशी संबंध बिघडू शकतात. कायदेशीर अडचणींपासून दूर राहा, तसेच प्रवास करताना काळजी घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : डिसेंबरच्या शेवटी शुक्र आणि मंगळ येणार एकत्र; 'या' 5 राशींवर होणार प्रेम-धनाचा वर्षाव

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget