(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Budh Vakri 2023: बुध ग्रह धनु राशीत वक्री झाल्याने 'या' राशींच्या लोकांचे नातेसंबंध बिघडणार; गैरसमज वाढणार
Mercury Retrograde in Sagittarius: बुध 13 डिसेंबरला धनु राशीत उलटी चाल चालेल, यामुळे काही राशीच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत. या काळात काही राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
Mercury Retrograde 2023: बुधला ग्रहांचा राजकुमार म्हटलं जातं. बुध हा बुद्धिमत्ता, ज्ञान, विचार करण्याची क्षमता, उत्तम तर्क क्षमता आणि चांगल्या संवाद कौशल्यांचा कारक आहे. बुद्धिमत्तेचा ग्रह मानला जाणारा बुध (Mercury) 13 डिसेंबरला दुपारी 12 वाजून 1 मिनिटांनी धनु राशीत वक्री होणार असून 28 डिसेंबरपर्यंत तो या स्थितीत राहणार आहे. यानंतर बुध उलट्या गतीत वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
बुध ग्रहाची उलटी चाल काही राशींना भारी पडणार आहे. जेव्हा बुध उलटी चाल चालतो, तेव्हा माणसाची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे नातेसंबंध आणि करिअरमध्ये अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. यावेळी धनु राशीत बुध वक्री झाल्यामुळे 4 राशीतील लोकांना याचा फटका बसणार आहे, या राशींबद्दल (Zodiac Signs) जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी बुधाची उलटी चाल शुभ ठरणार नाही. तुम्हाला एखाद्याशी संभाषणादरम्यान अडचणी येऊ शकतात. विशेषत: जे तत्वज्ञानी सल्लागार (Advisor) आहेत, शिक्षक (Teacher) आहेत किंवा राजकारणाच्या (Politicians) क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांनी आपल्या बोलण्यावर आणि शब्दांवर जास्त लक्ष द्यावं, अन्यथा तुमचा कोणाशी वाद किंवा भांडण होऊ शकतं. बुधाच्या वक्री काळात तुमच्या नात्यात गैरसमज वाढू शकतात. तुमच्या भावासोबत किंवा बहिणीसोबतच्या नातेसंबंधात तुम्हाला काही चढ-उतार दिसतील. तुमची तब्येतही बिघडू शकते, अशा परिस्थितीत तुम्हाला अधिक सावध राहण्याची गरज आहे.
मिथुन (Gemini)
बुध वक्री असल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं. बुधच्या अशुभ प्रभावामुळे तुमचे घरगुती जीवनही विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात काही वाद किंवा गैरसमज वाढू शकतात. धनु राशीतील बुधची उलटी चाल नवविवाहित जोडप्यांसाठी समस्या निर्माण करू शकते. काही लोकांची नाती तुटण्याच्या मार्गावरही येऊ शकतात. या राशीच्या लोकांना कोणताही निर्णय विचारपूर्वक घेण्याचा सल्ला दिला जातो. व्यवसायातही नुकसान होऊ शकतं.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाची उलटी चाल अनुकूल राहणार नाही. जोडीदारासोबतच्या नात्यात अनेक चढ-उतार येऊ शकतात. या काळात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या कटू बोलण्यामुळे तुम्ही वादात अडकू शकता. तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य डगमगू शकतं. लेखक, प्रसारमाध्यमं किंवा सोशल मीडियाशी संबंधित लोकांचं काम खराब होऊ शकतं. संवादाच्या कमतरतेमुळे तुमच्या भावंडांसोबतच्या नात्यात अडचणी येऊ शकतात. तुमची तब्येतही बिघडलेली दिसू शकते. तुम्ही काही कायदेशीर वादात अडकू शकता.
धनु (Sagittarius)
बुधाच्या उलट्या चालीमुळे धनु राशीच्या लोकांची प्रतिष्ठा खराब होण्याची शक्यता आहे. तुमचा सन्मान आणि आदर कमी होऊ शकतो. ऑफिसमध्ये तुमच्या कामात अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात. कामात प्रगती न होण्याची चिन्हं आहेत. धनु राशीमध्ये बुध वक्री काळात, तुम्ही करिअरशी संबंधित कोणताही निर्णय अत्यंत सावधगिरीने घ्या. हा काळ तुमच्यासाठी चांगला नसेल. तुमच्या वैवाहिक जीवनातही समस्या वाढू शकतात. जोडीदाराशी तुमचे मतभेद वाढू शकतात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही नुकसान होऊ शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
December 2023 : डिसेंबरमध्ये 5 महत्त्वपूर्ण ग्रह बदलणार चाल; 'या' राशींच्या लोकांना करणार मालामाल