Budh Margi 2024 : वर्षाच्या सुरुवातीलाच बुध वृश्चिक राशीत मार्गी; 'या' 4 राशींच्या समस्या संपणार
Mercury Direct 2024 : बुध आज वृश्चिक राशीत सरळ चालीत मार्गी झाला आहे, बुधाच्या या थेट भ्रमणामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे.
Budh Margi Effects : बुध ग्रहाला ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचं स्थान आहे. जेव्हा बुध शुभ ग्रहांसोबत संयोग करतो, तेव्हा तो शुभ आणि सकारात्मक परिणाम देतो, परंतु अशुभ ग्रहांसोबत तो नकारात्मक परिणाम देतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधाला नऊ ग्रहांच्या राजकुमाराचा दर्जा आहे. आज (2 जानेवारी) सकाळी 08:06 वाजता बुध (Mercury) थेट वृश्चिक राशीत मार्गी झाला आहे. बुधाच्या सरळ चालीमुळे काही राशीच्या लोकांच्या समस्या संपणार आहेत. या भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांना बुध थेट वृश्चिक राशीत मार्गी झाल्याने खूप दिलासा मिळणार आहे. बुधाच्या थेट चालीमुळे तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेले तुमचे मतभेद संपतील. जोडीदारासोबतचे तुमचे गैरसमज दूर होतील. बुधाच्या थेट मार्गक्रमणामुळे तुमच्या सर्व समस्या संपुष्टात येतील. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला नातेसंबंधांचे महत्त्व समजेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. वृषभ राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करतील. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी वृश्चिक राशीतील बुधाचे थेट भ्रमण लाभदायी ठरणार आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या सर्व समस्या संपू शकतात. या राशीचे लोक जे एखाद्या आजाराने त्रस्त आहेत, त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल. तुमच्या आईचे आरोग्यही पूर्वीपेक्षा चांगले राहील. नात्यातील गैरसमज दूर होतील. बुध थेट वळल्याने तुमच्या सर्व समस्या संपुष्टात येतील. तुम्ही तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकाल. मिथुन राशीचे विद्यार्थी ज्यांचे लक्ष अभ्यासातून विचलित होत होते ते पुन्हा पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करू शकतील.
सिंह रास (Leo)
वृश्चिक राशीत बुधाचे थेट भ्रमण तुमच्यासाठी चांगले राहील. सिंह राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. घर खरेदी करण्यासाठी किंवा तुमच्या गरजेनुसार पैसे गुंतवण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. ज्या लोकांचा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी वाद होत होता, त्यांच्या समस्यांचं आता बुध थेट चालीत असल्यामुळे निराकरण होईल. तुमचे संवाद कौशल्य तुम्हाला अनेक गैरसमजांपासून मुक्त करतील. व्यवसायाच्या क्षेत्रात सुरू असलेली आव्हाने दूर होतील. तुमच्या करिअरमध्ये यशाची शिखरे गाठण्याची संधी मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio)
आज बुध तुमच्या राशीत थेट मार्गी झाला आहे. वृश्चिक राशीत बुधाचे थेट भ्रमण तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल. बुधाची थेट चाल तुम्हाला आर्थिक लाभ देईल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमचा मोठा भाऊ आणि बहिणीसोबतचा तणाव दूर होईल आणि तुमच्या नात्यात गोडवा राहील. तुमच्या व्यक्तिमत्वात बदल होईल आणि तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक होईल. तब्येतीत सुरू असलेले चढ-उतार दूर होतील. जुन्या आजारापासून आराम मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani 2024: नवीन वर्षात 'या' राशींना जाणवणार शनीचा त्रास; समस्या वाढणार