(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : बुध आणि गुरुच्या वक्रीने 'या' 3 राशींचे फिरणार ग्रहमान; आर्थिक नुकसानीसह सोसावे लागतील कष्ट
Budh Guru Vakri Horoscope : नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह वक्री होणार आहे.
Budh Guru Vakri Horoscope : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतात. या राशी परिवर्तनाचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. हे राशी परिवर्तन काही राशींसाठी शुभ असतं तर काही राशींसाठी हा काळ संकटाचा असतो.
नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह वक्री होणार आहे. या व्यतिरिक्त देवगुरु बृहस्पती उलटी चाल अवस्थेत आहेत. याचा प्रभाव सर्व 12 राशींवर होणा आहे. यामध्ये 3 राशींना सावधान राहण्याची गरज आहे. या काळात तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
बुध आणि गुरु ग्रहाची वक्री चाल मेष राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक असणार आहे. या राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता दिसून येईल. नोकरदार वर्गातील लोकांना या काळात अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. या काळात गुंतवणूक करु नका. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. तसेच, खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
कर्क रास (Cancer Horoscope)
ग्रहांच्या मार्गी अवस्थेत असल्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी या काळात कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो. तसेच, तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. पैशांची बाबतीत तुमची फसवणूक होऊ शकते. तसेच, या कालावधीत तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
तूळ रास (Libra Horoscope)
ग्रहांच्या मार्गीमुळे तूळ राशीच्या लोकांना या काळात तुमच्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमच्या वैवाहित आयुष्यात अनेक संकटं येऊ शकतात. व्यापारी वर्गातील लोकांना नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :