Budh Gochar 2025 : अवघ्या काही तासांतच 3 राशींचं उजळणार भाग्य; बुध ग्रहाच्या अस्ताने धन-संपत्तीत होणार भरभराट, धनलाभाचे संकेत
Budh Gochar 2025 : बुध ग्रह वेळोवेळी अस्त आणि उदय सुद्धा होतो. अशातच बुध ग्रह 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 53 मिनिटांनी वृश्चिक राशीत अस्त होणार आहे.

Budh Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाला (Budh Gochar) नवग्रहांमध्ये बुद्धी आणि व्यवसायाचा कारक ग्रह मानतात. ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात. याचा प्रभाव प्रत्येक राशींवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतो. त्याचबरोबर, बुध ग्रह वेळोवेळी अस्त आणि उदय सुद्धा होतो. अशातच बुध ग्रह 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 53 मिनिटांनी वृश्चिक राशीत अस्त होणार आहे. तर, 27 नोव्हेंबरपर्यंत याच राशीत स्थित असणार आहेत.
बुध ग्रहाच्या अस्तामुळे अनेक राशींच्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडू शकतो. पण, काही राशी अशा आहेत ज्यांच्यावर शुभ परिणाम होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मकर रास (Capricon Horoscope)
मकर राशीच्या कुंडलीतील अकराव्या स्थानी बुध ग्रहाचा अस्त होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तुमची रखडलेली कामे तुम्हाला या काळात पूर्ण करता येतील. तसेच, नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या चौथ्या आणि सातव्या चरणाचा स्वामी बुध ग्रह नवव्या चरणात अस्त होणार आहे. त्यामुळे या कालावधीत तुमची जुनी जी रखडलेली कामे आहेत ती तुम्ही पूर्ण करु शकता. शिक्षण क्षेत्रात तुमचा विकास होण्याची शक्यता आहे. तसेच, कुटुंबात अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या समस्या दूर होतील. नवीन गोष्टी शिकता येतील. मानसिक तणावातून तुमची सुटका होईल.
कन्या रास (Virgo Horoscope)
बुध ग्रहाच्या अस्तामुळे कन्या राशीच्या लोकांना देखील चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशीच्या दुसऱ्या आणि दहाव्या चरणाचा स्वामी तिसऱ्या चरणात अस्त होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला कामे करता येतील. प्रगतीत येणारे अडथळे दूर होतील. तसेच, या कालावधीत तुमच्या हातात एखादा मोठा प्रोजेक्ट लागू शकतो. जोडीदाराचा सहवास तुम्हाला चांगला लाभेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















