एक्स्प्लोर

Astrology : आज मंगळवारी जुळून आले खास योग; 'या' 5 राशी ठरणार भाग्यवान, हनुमंताच्या कृपेने होणार धनलाभ, राशीनुसार करा 'हे' उपाय

Panchang 19 March 2024 : आज, म्हणजेच 19 मार्च रोजी रवि योग, शोभन योगासह अनेक प्रभावी योग तयार होत आहेत, त्यामुळे आज मंगळवारचा दिवस मिथुन, कन्यासह 5 राशींसाठी फलदायी ठरणार आहे. तसेच, मंगळवारचा दिवस बजरंगबली आणि मंगळ ग्रहाला समर्पित आहे, त्यामुळे या राशींवर हनुमंताची देखील कृपा राहील.

Astrology Today 19 March 2024 : आजचा दिवस ग्रहांच्या स्थितीमुळे फार महत्त्वाचा मानला जातो. आज मंगळवार 19 मार्चला चंद्र मिथुन राशीनंतर कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी असून या दिवशी शोभन योग, रवियोग आणि पुनर्वसु नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज तुमची मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. व्यवसायातून तुम्ही अधिक पैसे कमवू शकाल आणि अनेक अवघड कामं सहज पूर्ण होतील. तुमची देवावरील श्रद्धा वाढेल आणि तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक सहलीला जाण्याचा विचारही कराल. नोकरीत आज तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत वाद सुरू असतील तर ते आज चर्चेतून सोडवले जातील. तुमच्या स्वभावामुळे तुमचे अधिक मित्र बनतील.

मंगळवारचा उपाय : नशीब उजळवण्यासाठी हनुमानासमोर पाणयाचं भांडं ठेवा आणि त्यासमोर बसून 21 दिवस हनुमान चालिसा पठण करा. दररोज पाठानंतर पाणी सेवन करा आणि दुसऱ्या दिवशी दुसरं पाणी ठेवा.

मिथुन रास (Gemini)

आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना ज्या कामांमध्ये अडचणी येत होत्या, त्या आज दूर होतील. तुम्हाला पैसे कमवण्याचे आणखी मार्ग दिसतील. व्यावसायिकांना आज मोठी बिझनेस ऑर्डर मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही अधिक नफा मिळवू शकाल. तुम्हाला नोकरी बदलायची असल्यास इतर ठिकाणी अर्ज करू शकता, जिथून तुम्हाला चांगली ऑफर मिळू शकेल. आईची तब्येत ठिक नसेल तर आज तिला बरं वाटेल.

मंगळवारचा उपाय : आर्थिक प्रगतीसाठी पाच मंगळवार मंदिरात फूल वाहा आणि लाल गाईला भाकरी खाऊ घाला.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. आज कन्या राशीच्या लोकांची सर्व दु:खं आणि संकटं हनुमंताच्या कृपेने दूर होतील आणि सकाळपासूनच त्यांना एकामागून एक शुभवार्ता मिळू लागतील. तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकाल आणि तुम्हाला कामात उत्साही वाटेल. तुम्ही घरी काही धार्मिक कार्यक्रम आयोजित करू शकता. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी अनुभवाचा भरपूर फायदा मिळेल, ज्यामुळे ते त्यांच्या करिअरमध्ये पुढे जातील. तसेच तुम्ही घर, दुकान, घर इत्यादी खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता.

मंगळवारचा उपाय : शुभ फळ प्राप्त करण्यासाठी लाल रंगाचे कपडे परिधान करा. तसेच हनुमानाला गूळ आणि चणे अर्पण करा.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. वृश्चिक राशीच्या लोकांचं आरोग्य आज चांगलं राहील. कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला दिलासा मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत आणि घरातील व्यक्तींसोबत तुम्ही चांगले संबंध ठेवाल. विद्यार्थीही त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. भागीदारीत काम करणाऱ्यांना चांगले लाभ मिळतील आणि तुम्ही खूप पैसे कमवाल. तुमच्या वडिलांसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होईल, ज्यामुळे तुम्हाला कौटुंबिक व्यवसायात फायदा होईल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर दीर्घकालीन गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमची एखादी इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुम्ही कुटुंबातील सदस्यांसाठी एक छोटी पार्टी आयोजित करू शकता.

मंगळवारचा उपाय : संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी 11 पिंपळाची पानं स्वच्छ करून त्यावर चंदनाने श्रीराम लिहून हनुमानाला अर्पण करा.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. मीन राशीच्या लोकांना आज एखाद्या थोर व्यक्तीकडून मोलाचा सल्ला मिळेल, ज्याचा तुम्हाला जीवनाच्या सर्व क्षेत्रात फायदा होईल. आज हनुमंताच्या कृपेने तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती किंवा एखाद्या ठिकाणाहून अनपेक्षित पैसे मिळू शकतात. मीन राशीचा नोकरदार वर्ग आज त्यांच्या इच्छेनुसार काम करेल. तुम्हाला तुमच्या करिअर संदर्भात काही चांगली बातमी मिळू शकते. सुख-सुविधांमध्ये वाढ झाल्याने तुमचं मन प्रसन्न राहील आणि विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल.

मंगळवारचा उपाय : वादातून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमंताच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या आणि 11 परिक्रमा केल्यानंतर हनुमान चालीसा पाठ करा किंवा हनुमान मंत्रांचा जप करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 19 March 2024 : आजचा मंगळवार खास! बजरंगबलीची 'या' राशींवर राहणार विशेष कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Bhosale Khokya Bhai : खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
BMC : कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 10 March 2025Thackeray vs Eknath Shinde : ठाकरे-शिंदे पहिल्यांदाच समोरासमोर, पण एकमेकांना का टाळलं? जाणून घ्याABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4 PM 10 March 2025Eknath Shinde - Uddhav Thackeray पहिल्यांदाच समोरासमोर, एकमेकांकडे पाहिलंही नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Bhosale Khokya Bhai : खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
BMC : कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Raj Thackeray : राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
Maharashtra Budget 2025 : कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
'या' कारणांनी थंडगार फ्रीजमध्ये होऊ शकतो 'स्फोट'
'या' कारणांनी थंडगार फ्रीजमध्ये होऊ शकतो 'स्फोट'
Embed widget