(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : आज ऐन कोजागिरी पौर्णिमेला महालक्ष्मी योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 5 राशींना होणार डबल लाभ, अचानक पैसा येणार
Panchang 16 October 2024 : आज बुधवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी महालक्ष्मी योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology Panchang 16 October 2024 : आज, बुधवार, 16 ऑक्टोबर रोजी चंद्र गुरूच्या मीन राशीत प्रवेश करणार आहे आणि दोन शुभ ग्रह म्हणजे शुक्र आणि गुरू समोरासमोर येतील, ते महालक्ष्मी योग तयार करत आहेत. तसेच आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी असून ही तिथी कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2024) किंवा शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. शास्त्रानुसार, या दिवशी माता लक्ष्मी समुद्रमंथनातून प्रकट झाली आणि चंद्र 16 चरणांसह पूर्ण झाला.
आज शरद पौर्णिमेच्या दिवशी ध्रुव योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्राचा, महालक्ष्मी योगाचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. मेष राशीच्या लोकांना कौटुंबिक तणावातून आराम मिळेल. गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे, यातून तुमची संपत्ती वाढेल. आज तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, मिळालेल्या पैशाने तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकाल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज प्रगतीच्या अनेक संधी मिळतील आणि कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभावही वाढेल. जर तुमचे सासरच्या लोकांशी काही वाद होत असतील तर ते आज संपतील. संध्याकाळी मुलांसोबत तुमचा वेळ व्यतित होईल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभाचा असणार आहे. कर्क राशीच्या लोकांचं कोणतंही सरकारी काम दीर्घकाळ प्रलंबित असेल तर ते आज महालक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही समाज सुधारणेचं काम कराल आणि शुभ कामांवर पैसे खर्च कराल, ज्यामुळे समाजात तुमचा मान वाढेल. व्यवसाय करणारे आज चांगला नफा मिळवू शकतील आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही करतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना आज चांगली बातमी मिळेल. आज शरद पौर्णिमेमुळे घरात धार्मिक वातावरण असेल. तुमचं आरोग्य आज चांगलं राहील आणि कोणताही मोठा त्रास होणार नाही.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. कन्या राशीचे लोक आज अत्यंत कठीण कामही पूर्ण मेहनतीने पूर्ण करतील. अडकलेले पैसे परत मिळाल्यावर आज तुम्हाला समाधान मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. मुलांमुळे घरातील वातावरण आनंददायी राहील. संध्याकाळी तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा तुमचा प्लॅन असेल.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी लाभाचा असणार आहे. धनु राशीचे लोक आज देवी लक्ष्मीच्या कृपेने आपले ध्येय साध्य करू शकतील आणि सर्व प्रकारच्या परिस्थिती सहजतेने हाताळतील. जर तुम्ही न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकले असाल तर आज तुम्हाला दिलासा मिळेल, ज्यामुळे तुमच्या मनावरील ओझंही हलकं होईल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला आज चांगला नफा मिळेल. आज तुमच्या मनात कोणतीही बिझनेस आयडिया येईल ती लगेच अंमलात आणा आणि फेस्टिव्हलमुळे तुम्हाला नवीन प्रोडक्ट्सचा समावेश करण्याची संधी मिळेल. या राशीच्या ज्या लोकांना नोकरी, शिक्षणासाठी परदेशात जायचंआहे, त्यांचं स्वप्न आज पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करेल.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांच्या कुटुंबात आज धार्मिक वातावरण असेल आणि सर्व सदस्यही सहकार्य करतील. आज दुपारपर्यंत तुम्हाला काही चांगली बातमी देखील ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील. तुमचं एखादं काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल तर आज ते तुम्हाला पूर्ण करता येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :