एक्स्प्लोर

Astrology : आज ब्रह्म योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 5 राशींवर राहणार बाप्पाची कृपा, अनपेक्षित स्रोतांतून पैशांची आवक सुरुच राहणार

Panchang 13 August 2024 : आजचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. वृषभसह 5 राशींवर आज बाप्पाची विशेष कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Panchang 13 August 2024 : आज मंगळवार, 13 ऑगस्ट रोजी मंगळ राशीत चंद्राचं भ्रमण होणार आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी ब्रह्मयोग, ऐंद्र योग आणि विशाखा नक्षत्र  यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व वाढलं आहे. आज बनत असलेल्या शुभ योगांचा 5 राशींना फायदा होणार आहे, या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. आज नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगलं सहकार्य मिळेल आणि तुमच्या मुलांचा विकास पाहून तुम्हाला आनंद होईल. जे विद्यार्थी सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांना शुभ परिणाम मिळतील. नोकरदार लोकांना आज अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. आज सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास शिखरावर असेल, त्यामुळे अनेक कामं पूर्ण होतील. जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर आज बाप्पाच्या कृपेने तुम्हाला आराम मिळू शकतो आणि अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. आज तुम्हाला एखाद्या व्यक्तीमुळे व्यवसायात नफा होईल आणि तुम्ही इतर व्यवसायातही गुंतवणूक करू शकता. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण राहील.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. आज तुम्हाला गुप्त स्त्रोतांकडून अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला अनेक दिवसांपासून एखादं वाहन किंवा जमीन खरेदी करण्याची इच्छा असेल तर आज बाप्पाच्या कृपेने ही इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरदार लोक आज कामाच्या ठिकाणी आपल्या कौशल्याने सर्वांना प्रभावित करतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. संध्याकाळी तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळेल.

धनु रास (Sagittarius)

आज धनु राशीच्या लोकांसाठी दिवस सकारात्मक असणार आहे. आज तुमची सर्व कामं हळूहळू पूर्ण होतील आणि तुमच्या मित्रांची संख्याही वाढेल. आज तुम्ही सर्व प्रकारच्या अडथळ्यांना तोंड देऊ शकाल आणि तुमच्या विचारात सकारात्मक बदल दिसून येतील. नोकरी करणाऱ्यांना आज नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये त्यांना सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन डील मिळू शकतात.

मकर रास (Capricorn)

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी आशेचा नवीन किरण घेऊन आला आहे. जर काही कायदेशीर बाबी चालू असतील तर आज निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ राहील, नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला चांगला परतावा मिळेल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला फायदा होईल आणि प्रत्येक पावलावर आजूबाजूच्या लोकांकडूनही साथ मिळेल. जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर ते तुम्हाला आज कोणत्याही त्रासाशिवाय मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 13 August 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast : दिल्लीत भीषण स्फोट, ८ ठार, १४ जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Delhi Blast : ‘आयुष्यात इतका मोठा आवाज ऐकला नाही’, लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटावर प्रत्यक्षदर्शींची प्रतिक्रिया
Delhi Blast: 'मृतांचा आकडा वाढण्याची भीती', राजधानी हादरली; Mumbai मध्ये हाय अलर्ट
Delhi Blast Alert: 'खिडकी हिल गई', लाल किल्ला स्फोटानंतर Delhi हादरली, राजधानीत High Alert
Delhi Blast: 'संपूर्ण Delhi हाय अलर्टवर', Lal Qila स्फोटानंतर दहशतीचे वातावरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
Pankaja Munde: वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे गहिवरल्या
वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे गहिवरल्या
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोन्याचे दर वाढणार की घसरणार, सोनं खरेदी करावं की थांबावं?
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोन्याचे दर वाढणार की घसरणार, सोनं खरेदी करावं की थांबावं?
Ajinkya Naik : मुख्यमंत्री, शरद पवार आणि आशिष शेलारांना मी योग्य खेळाडू वाटलो; MCA अध्यक्षपदावर बिनविरोध निवड, अजिंक्य नाईक यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री, शरद पवार आणि आशिष शेलारांना मी योग्य खेळाडू वाटलो; MCA अध्यक्षपदावर बिनविरोध निवड, अजिंक्य नाईक यांची प्रतिक्रिया
शरद पवारांची 'ती' गुगली अन् अजिंक्य नाईक बनले एमसीए निवडणुकीच्या मैदानात चॅम्पियन, इनसाईड स्टोरी
शरद पवारांची 'ती' गुगली अन् अजिंक्य नाईक बनले एमसीए निवडणुकीच्या मैदानात चॅम्पियन, इनसाईड स्टोरी
Embed widget