(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींच्या धनात होणार वाढ, करिअरमध्ये गाठाल प्रगतीचे शिखर
Panchang 10 April 2024 : आज रवि योग, प्रीति योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, त्यामुळे आजचा दिवस वृषभसह 5 राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology Today 10 April 2024 : आज बुधवार, 10 एप्रिलला चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी देवी दुर्गेच्या दुसऱ्या रुपाची पूजा केली जाते. तसेच ग्रहांबद्दल बोलायचं झाल्यास, आज चंद्र हा मेष राशीत भ्रमण करणार आहे, जिथे गुरु आणि बुध आधीपासूनच आहेत, त्यामुळे आज गजकेसरी योग, त्रिग्रही योग तयार होत आहेत.
या शुभ योगांसोबतच चैत्र नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी रवियोग, प्रीति योग आणि भरणी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. आज वृषभ राशीच्या लोकांची प्रलंबित कामं पूर्ण होऊ लागतील आणि पैशाशी संबंधित समस्याही दूर होतील. तुम्ही तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित कराल. तुमचं आरोग्य देखील पूर्णपणे तंदुरुस्त राहील. नोकरी करणारे त्यांच्या कामात पूर्णपणे समाधानी असतील. चैत्र नवरात्रीमुळे तुम्ही धार्मिक कार्यात गुंतलेले असाल. कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंद असेल, तुम्ही घरगुती जबाबदाऱ्याही पार पाडाल, ज्यामुळे तुमचे पालक तुमच्यावर खूप प्रभावित होतील. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं तर, जर तुमच्या जोडीदाराशी तुमचे मतभेद झाले असतील तर ते आज दूर होतील आणि नात्यात प्रेम आणि विश्वास कायम राहील.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. कर्क राशीचे लोक आज त्यांच्या सुखसोयींवर पैसा खर्च करतील. तुमची परदेशात जाण्याचीही शक्यता आहे. जर तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला आज त्यातून चांगला नफा मिळेल. तुम्ही मित्रांसोबत सुट्टीवरही जाऊ शकता. व्यवसायात तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात करताना दिसाल आणि तुमची संपत्ती वाढवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करत राहाल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळू शकते. अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने नोकरदार लोक त्यांची कामं वेळेवर पूर्ण करतील. प्रेम जीवनात असलेल्यांसाठी आजचा दिवस शुभ असेल, तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं घट्ट होईल आणि तुम्ही भविष्याविषयी चर्चा देखील कराल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. तूळ राशीच्या लोकांची प्रदीर्घ प्रलंबित कामं आज पूर्ण होऊ शकतील. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची अपेक्षा आहे आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. आज नशिबाने तुम्हाला साथ दिली तर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात तुमचं भाग्य उजळेल, तुमची प्रगती होईल आणि तुमचा प्रभावही वाढेल. जर तुम्हाला बऱ्याच काळापासून एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करायची असेल तर आज तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगलं राहील आणि मुलांचा विकास पाहून मन प्रसन्न राहील.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी सुखद परिणाम देणारा ठरेल. धनु राशीचे लोक आज सर्वांचे हित लक्षात घेतील. विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणींपासून दिलासा मिळेल आणि वडिलांचे-शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. सामाजिक कार्यक्रमात मोठं पद मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल आणि काही महत्त्वाच्या चर्चेत सहभागी होण्याची संधीही मिळेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्यानंतर तुम्ही आनंदी व्हाल. नोकरदार लोकांना आज एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते, ज्यामुळे त्यांना करिअरमध्ये समाधान मिळेल आणि त्यांचा पगारही वाढेल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. मीन राशीच्या लोकांवर आज देवी दुर्गेची कृपा असेल, ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक केल्याने तुम्हाला फायदा होईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने वातावरण प्रसन्न राहील. तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीकडून भेट म्हणून एखादी मौल्यवान वस्तू मिळू शकते. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, पती-पत्नीमधील प्रेम या काळात वाढेल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Vastu Tips : धनलाभासाठी आजच घरी आणा 'ही' एक वस्तू; आर्थिक संकट होईल दूर, नांदेल सुख-समृद्धी