Astrology : सुख-समृद्धीसाठी शुक्रवारी 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या, देवी लक्ष्मीची होईल कृपा! ज्योतिषशास्त्रानुसार उपाय जाणून घ्या
Astrology : शुक्रवारी काही खास उपाय केल्याने जीवनात देवी लक्ष्मीचे नेहमी आशीर्वाद राहतात. शुक्रवारी काही खास गोष्टींची काळजी घ्या. ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या या खास उपायांबद्दल.
Astrology Tips : हिंदू धर्मानुसार, प्रत्येक वार विविध देवतांना समर्पित करण्यात आला आहे. वेगवेगळ्या वाराला विविध देवतेची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्रवारी देवी लक्ष्मीची (Goddess Lakshmi) पूजा केली जाते. या दिवशी भक्त देवीला प्रसन्न ठेवण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद घेण्यासाठी उपवास करतात. या दिवशी संपूर्ण विधीपूर्वक मातेची पूजा केली जाते. देवी लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि ज्यावर तिचा आशीर्वाद असतो, तिच्या आयुष्यात कधीही संपत्ती आणि समृद्धीची कमतरता नसते.
शुक्रदेवाच्या कृपेने जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही
शुक्रवार हा शुक्र ग्रह किंवा शुक्रदेव यांच्याशी देखील संबंधित मानला जातो. शुक्रदेव हा सुख, सौंदर्य आणि प्रणय यांचा कारक मानला जातो. असे मानले जाते की शुक्रवारी काही विशेष उपाय पूर्ण भक्ती आणि समर्पणाने केल्यास जीवनात सदैव आशीर्वाद मिळतात. शुक्रदेवाच्या कृपेने जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही. जाणून घ्या या खास उपायांबद्दल.
शुक्रवारी या गोष्टी लक्षात ठेवा
-देवी लक्ष्मी आणि शुक्राचा आशीर्वाद मिळविण्यासाठी शुक्रवारचा उपवास हा अतिशय प्रभावी मार्ग आहे.
-या दिवशी शुक्र देवाचा विशेष मंत्र “ओम शुन शुक्राय नमः” किंवा “ओम हिमकुंडमृणालाभम् दैत्यान परमं गुरुं सर्वशास्त्रं प्रवर्तकं भार्गवम् प्रणमयाहम्” या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.
-देवी लक्ष्मी आणि शुक्रदेव यांना स्वच्छता आवडते. म्हणूनच जर तुम्हाला त्यांचा आशीर्वाद हवा असेल तर तुमच्या घरातील वातावरण शुद्ध ठेवा आणि घरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या.
-शुक्रवारचा संबंध पांढऱ्या रंगाशी आहे, त्यामुळे या दिवशी हा रंग जास्तीत जास्त वापरावा. शुक्रवारी पांढर्या रंगाचे कपडे परिधान करूनच पूजा करावी.
-या दिवशी शुक्र ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान करणे देखील शुभ आहे. शुक्रवारी तांदूळ, दूध, दही, मैदा आणि साखरेचे दान या पांढर्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे
-याशिवाय शुक्रवारी मुंग्या आणि गायींना पीठ खाऊ घालण्याने शुक्रदेवाची कृपा होते.
-भगवान विष्णूंशिवाय देवी लक्ष्मीची पूजा अपूर्ण मानली जाते, म्हणूनच शुक्रवारी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची एकत्र पूजा करावी. यामुळे धन-धान्य आणि वैभव प्राप्त होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Amalaki Ekadashi 2023: आमलकी एकादशी! पद्मपुराणानुसार व्रताचे महत्त्व जाणून घ्या; भगवान विष्णू होतील प्रसन्न