(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : दिवस उरले अवघे 5, तूळ राशीत जुळून येणार लक्ष्मी नारायण योग; 3 राशींचा गोल्ड टाईम होणार सुरु
Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार, 10 ऑक्टोबरला ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह सकाळी 11 वाजून 25 मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराने आपली चाल बदलतात. या राशी परिवर्ताचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर होतो. काही राशींसाठी हा परिणाम शुभ असतो तर काही राशींवर अशुभ असतो. ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह 10 ऑक्टोबर रोजी राशी परिवर्तन करणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, 10 ऑक्टोबरला ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह सकाळी 11 वाजून 25 मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, बुध ग्रह हा बुद्धी, तर्क आणि मित्राचा कारक ग्रह आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, 13 ऑक्टोबरपर्यंत सुख-सुविधांचा दाता शुक्र आपली मूळ रास म्हणजेच तूळ राशीतच असणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी बुध ग्रहसुद्धा याच राशीत प्रवेश करणार आहे. तूळ राशीत बुध आणि शुक्राच्या युतीने लक्ष्मी नारायण योग जुळून येणार आहे. हा योग तीन राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. या तीन राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
लक्ष्मी नारायण योग मेष राशीच्या लोकांसाठी फार लाभदायी असणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. कौटुंबिक स्थिती चांगली असेल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगली प्रगती पाहायला मिळेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
तूळ राशीत जुळून येणाऱ्या लक्ष्मी नारायण योगाचा वृषभ राशीच्या लोकांना चांगलाच लाभ होणार आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तसेच, जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना शुभ परिणाम मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी हा काळ चांगला आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
लक्ष्मी नारायण योगाचा सिंह राशीच्या लोकांना चांगला परिणाम मिळेल. या काळात तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, धनलाभाचे चांगले संकेत आहेत. तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्या कारणाने तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: