Astrology : देवाला नैवेद्य दाखवताना 'या' चुका चुकूनही करु नका; अन्यथा... प्रेमानंद महाराजांनी सांगितलं कारण...
Astrology : नैवेद्य दाखवताना काही चुका अजिबात करु नयेत असं प्रेमानंद महाराज सांगतात. त्यामुळे नैवेद्य दाखवताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घेऊयात.

Astrology : हिंदू धर्मात देवी-दैवतांची पूजा करताना देवाला नैवेद्य दाखवला जातो. देवाला नैवेद्य ठेवताना त्यात फळं, मिठाई, पंचपक्वान यांसारख्या गोष्टी अर्पित करतात. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक देवाचा आवडा नैवेद्य वेगळा असतो. हा नैवेद्य देवाला दाखवल्याने देव प्रसन्न होतात. नैवेद्य दाखवताना तो नेहमी विधीवत दाखवावा. त्याचबरोबर नैवेद्य दाखवताना काही चुका अजिबात करु नयेत असं प्रेमानंद महाराज सांगतात. त्यामुळे नैवेद्य दाखवताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घेऊयात.
नैवेद्यात फळं चढवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
देवाला नैवेद्यात फळं चढवणं फार सामान्य बाब आहे. अनेकदा भाविक देवाला नैवेद्य अर्पण करताना बाजारातून फळं आणून ती न धुता, त्याची सालं न काढता देवाला अर्पण करतात. मात्र, हे करणं चुकीचं आहे. या संदर्भात प्रेमानंद महाराज सांगतात की, देवाला नेहमी नैवेद्य असाच दाखवावा ज्या प्रकारे आपण अन्न ग्रहण करतो.
देवाला नैवेद्यात फळं अर्पण करताना ती फळं नेहमी धुतलेली असावी, तसेच, बिया असणाऱ्या फळांमधून बिया काढाव्यात आणि मगच देवाला अर्पण करावीत. सफरचंद, संत्र, टरबूज यांसारखी फळं कापून, सोलून किंवा बिया काढून अर्पण करावीत आणि प्रेमाने देवाला नैवेद्य अर्पण करावा. तरंच तो त्याचा स्वीकार करतो.
'या' गोष्टींची देखील काळजी घ्या...
- देवाला नैवेद्य दाखवताना कोणत्याच प्रकारची चूक करु नका. अन्यथा देव नाराज होऊ शकतात.
- नैवेद्य दाखवताना देवाला फक्त सात्विक भोजनच अर्पण करा.
- नैवेद्य सोनं, चांदी, पितळ किंवा मातीच्या भांड्यातूनच अर्पण करा. लोखंड, अॅल्युमिनिअम, काच किंवा प्लास्टिकच्या भांड्यात नैवेद्य दाखवण्याची चूक करु नका.
- नैवेद्याला तासन् तास देवासमोर ठेवू नका. यामुळे नैवेद्याचा अनादर होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:















