Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती पाहता आजचा दिवस 9 मे 2024 गुरुवार फार महत्त्वाचा आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष सुरु झाला आहे. त्यामुळे चंद्र वृषभ राशीत संक्रमण करणार आहे. त्याचबरोबर आज शोभन योग देखील तयार होत आहे. त्यामुळे अनेक राशीच्या (Zodiac Sings) लोकांना याचा लाभ घेता येणार आहे. 


मेष रास (Aries Horoscope)


आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूपच लाभदायी ठरू शकतो. जर तुम्ही नवीन नोकरीसाठी अप्लाय केलं असेल तर तुम्हाला आज तेथून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. व्यापारी वर्गाला त्यांच्या मित्रांच्या माध्यमातून व्यवसायात लाभ होऊ शकतो. तर, लोखंडाचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनाही आज चांगले परिणाम मिळणार आहे. तुमची कौटुंबिक परिस्थिती चांगली असणार आहे. आज जवळच्या नातेवाईकांचं घरी आगमन होऊ शकतं. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आज अववजड सामान उचलणं टाळा. याचं कारण म्हणजे तुम्हाला आज मानेचा त्रास देखील होऊ शकतो. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांला असणार आहे. जे लोक मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांचं नेटवर्क आज कमजोर असू शकतं. त्यामुळे त्यावर काम करणं गरजेचं आहे. व्यापाराशी संबंधित तुमचा आज अनेक लोकांशी संपर्क होऊ शकतो. भेटीगाठी वाढू शकतात. या दरम्यान समंजस्याने व्यवहार करा. जे युवक आहेत ते मित्रांबरोबर फिरण्याचा प्लॅन करू शकतात. आजच्या दिवशी कामाची दगदग असेल पण तुम्ही संयम ठेवणं गरजेचं आहे. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. तुमच्या ऑफिसमध्ये आज अनेक गॉसिप्स होतील पण तुम्ही याचा एक भाग होऊ नका. अन्यथा ते नंतर तुम्हालाच महागात पडू शकतं. व्यावसायिकांनी आपलं नेटवर्क वाढवणं गरजेचं आहे. अन्यथा व्यवसायावर परिणाम होईल. जे आपल्या जोडीदारापासून दूर राहतायत त्यांनी सतत आपल्या पार्टनरबरोबर संपर्क साधावा. तसेच, आज तुमचं आरोग्य उत्तम असेल पण निष्काळजीपणा करू नका. 


कन्या रास (Virgo Horoscope)


जे कन्या राशीचे लोक आहेत त्यांनी आपली कामं वेळेत करणं गरजेचं आहे. तुमच्या क्लाएंटबरोबर व्यवहार करताना सावधानता बाळगा. वाणीवर नियंत्रण ठेवा. ज कामाच्या ठिकाणी तणाव असाल पण कौटुंबिक वातावरणात आनंद असेल. मुलांबरोबर तुमचा वेळ आनंदात जाईल. 


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभदायी ठरू शकतो. आज मीडिया क्षेत्राशी संबंधित लोकांना आज शुभवार्ता मिळू शकते. पण, कामात खबरदारी घ्या. व्यावसायिकांचे आज अनेक नवीन प्रोजेक्ट्स फायनल होतील. कुटुंबियांबरोबर धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : शनीची वक्री चाल 'या' 4 राशींसाठी आव्हानात्मक; एकामागोमाग येतील संकटं, आजपासूनच शनीचे 'हे' उपाय करा