Shani Dev : ज्योतिषशास्त्रानुसार, शनीला (Lord Shani) न्यायदेवता, कर्मफळदाता आणि दंडाधिकारी सुद्धा म्हटलं गेलं आहे. कारण, शनी देव (Shani Dev) प्रत्येकाला आपल्या कर्मनुसार फळ देतात. आपल्याला माहीत आहे की, सर्वच ग्रह शनी देवाप्रमाणेच एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात. आणि त्या व्यक्तीच्या कर्मानुसार त्यांना शुभ तसेच अशुभ फळ देतात. 


पण, जेव्हा शनी देव वक्री अवस्थेत असतात तर व्यक्तीच्या आयुष्यात अनेक चढ-उतार निर्माण होतात. सध्या शनी आपल्या मूळ राशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. शनी देव याच राशीत वक्री होणार आहेत. त्यामुळे शनीची वक्री चाल कधी होणार हे जाणून घेऊयात. 


शनीची वक्री चाल तिथी आणि वेळ 


ज्योतिषशास्त्रानुसार, 29 जून 2024 रोजी शनी कुंभ राशीत वक्री होणार आहेत. 29 जून रोजी रात्री साधारण 12 वाजून 35 मिनिटांनी शनी देव वक्री अवस्थेत असतील आणि 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत ते याच स्थितीत असणार आहेत. त्यामुळे या दरम्यान शनीची उलटी चाल काही राशींसाठी महागात पडू शकते. जून ते नोव्हेंबर हा पाच महिन्यांचा काळ कोणत्या राशींसाठी अशुभ परिणाम देणारा असेल आणि त्यावर उपाय नेमके काय करावेत हे जाणून घेऊयात. 


'या' राशींवर असणार शनीची वक्री चाल 


मेष रास (Aries Horoscope)


शनीची वक्री चाल मेष राशीसाठी फार कष्टाची असण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रत्येक कार्यात या दरम्यान अनेक अडचणी निर्माण होतील. तसेच, धनहानी देखील होण्याची शक्यता आहे. तुमचे इतरांबरोबर वाद-विवाद वाढू शकतात. त्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे शनीच्या वक्री अवस्थेत खचून जाऊ नका तर खूप मेहनत करून आपल्या कामावर लक्ष द्या. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांवर देखील शनीची वक्री चाल नकारात्मक परिणाम देणारी असेल. कारण शनी आपल्या राशीतील दहाव्या भावात असणार आहेत. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. तसेच, या काळात तुमच्या व्यापारात देखील नुकसान होण्याची शक्यता आहे. 


मकर रास (Capricorn Horoscope)


शनीची वक्री चाल मकर राशीच्या लोकांसाठी फारच चिंताजनक असणार आहे. विशेषत: काळात तुमच्या करिअरवर जास्त लक्ष केंद्रित करा. वेळेनुसार काम न झाल्याने तुम्ही हताश होऊ शकता. 


मीन रास (Pisces Horoscope)


ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या वक्री चालीचा परिणाम मीन राशीवर देखील राहणार आहे. या दरम्यान तुमचे अनेकांबरोबर वाद-विवाद होऊ शकतात. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 


शनी वक्री 2024 चे उपाय 



  • शनीच्या वक्री दृष्टीच्या परिणामांपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही शनीदेवाबरोबरच हनुमानाची आणि भगवान भैरव यांची पूजा करा. 

  • महामृत्यूंजर मंत्राचा जप केल्यानेही शनी देव शांत होऊ शकतात. 

  • शनिवारच्या दिवशी काळे तीळ, काळी उडीद, लोह, मोहरीचे तेल, काळे कपडे, काळे बूट इ, वस्तू दान करा. यामुळे अशुभ परिणाम कमी होतील. 

  • शनीची वक्री अवस्था ज्या राशींवर अशुभ परिणाम देते त्या राशीच्या लोकांनी रोज कावळा किंवा काळ्या कुत्र्याला चपाती खाऊ घालावी. 

  • एका वाटीत मोहरीचं तेल घेऊन त्यात आपला चेहरा पाहा आणि ते दान करा. यामुळे तुमचे अशुभ प्रभाव कमी होतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : कुंभ राशीत शनीची वक्री चाल! 'या' 4 राशीच्या लोकांवर असेल शनीची कृपा; शिक्षण, नोकरीत प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध