मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra Weather) पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज (Unseasonal Rain Prediction) हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. एकीकडे नागरिक उष्णतेच्या लाटेने (Heatwave) नागरिक हैराण असताना, पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. काही भागात गारपीटही झाली आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात आजही अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. त्याशिवास पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचं हवामान विभागाने (Weather Forecast) म्हटलं आहे.
मुंबईसह कोकण तापणार
कोकणात उकाडा वाढला आहे. मुंबईसह कोकण विभाग उष्णतेच्या लाटेत होरपळत असताना दिसत आहे. मुंबईसह कोकण पट्टा पुढील चार दिवसात उन्हाच्या तडाख्याच होरपळणरा आहे. मुंबई, ठाणेसह कोकणात तापमानात फारसा जास्त बदल होण्याची शक्यता नाही. तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD Forecast) वर्तवला आहे.
पूर्व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता
पूर्व विदर्भाला अवकाळी पावसासह गारपिटीने (Hailstrom) झोडपलं आहे. याभागात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज (Unseasonal Rain) कायम आहे. दरम्यानपूर्व विदर्भात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे फळबागांसह शेतीचं नुकसान झालं आहे.
मराठवाड्याती पावसाच्या सरी कोसळणार
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील चार दिवसांचा अंदाज
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे. आयएमडीच्या अंदााजानुसार, विदर्भासह मराठवाड्यात 12 मेपर्यंत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा आणि नांदेड येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. लातूर, आणि हिंगोली जिल्ह्यातही अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :