Aries Horoscope Today 29 January 2023 : मेष राशीच्या लोकांनी आज वादविवाद टाळा, राशीभविष्य जाणून घ्या
Aries Horoscope Today 29 January 2023 : मेष राशीच्या लोकांची ग्रहस्थिती आज शुभ दिसत नाही. नोकरी आणि व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. राशीभविष्य जाणून घ्या
Aries Horoscope Today 29 January 2023 : मेष (Aries) राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र जाणार आहे. आज काही लोकांना तुमचे बोलणे वाईट वाटू शकते. मात्र,आज तुम्ही लोकांचे मन वळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न कराल, आज वादविवाद होऊ शकतात. तुमच्यासाठीही हा व्यस्त दिवस आहे. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आजचे राशीभविष्य जाणून घ्या (Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा जाईल?
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी काही बाबतीत प्रतिकूल असू शकतो. आज तुम्ही काही चांगल्या संधी गमावाल. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस कमकुवत असणार आहे, कारण शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकतात. नोकरीतील लोकांकडून तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा होईल. सहकाऱ्यांकडून कौतुकही मिळेल. आज तुम्हाला मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि नशीबही तुमची साथ देईल.
आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन
कुटुंबातील सदस्य तुमची प्रशंसा कमी आणि टीका जास्त करतील. तुमच्या निवडीनुसार तुमचा न्याय केला जाईल. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये जोरदार वाद होण्याची शक्यता आहे. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या.
आज मेष राशीचे आरोग्य
आज तुम्हाला आरोग्याबाबत कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. आज तुमचे आरोग्य चांगले राहील. फक्त वेळेवर खा आणि आपल्या आहारात अधिक फळांचा समावेश करा.
आज नशीब 92% तुमच्या बाजूने
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीतरी नवीन सूचित करेल. व्यवसायात काही नवीन बदल करण्याचा प्रयत्न कराल, फायदा होईल. दिवसाच्या सुरुवातीला प्रेम जीवनाचा आनंद घ्याल आणि उत्पन्न देखील चांगले राहील. परंतु दुपारनंतर परिस्थिती बदलू शकते. कामावर आणि घरात काही मानसिक चिंता त्रासदायक ठरू शकतात. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने असेल. गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा.
मेष राशीसाठी आजचे उपाय
मेष राशीसाठी आजचे उपाय सांगण्यात आले आहेत की, सूर्याला नमस्कार करून पाण्यात लाल चंदन टाकून अर्घ्य द्यावे. साईबाबांना प्रसाद म्हणून गुळ अर्पण करा.
शुभ रंग - निळा
शुभ क्रमांक - 3
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Horoscope Today 29 January 2023: आज मेषसह 4 राशींवर सुर्यदेवाचा आशीर्वाद असेल, राशीभविष्य जाणून घ्या