Shani Jayanti 2022 : शनी जयंतीच्या दिवशी साडेसती मिळेल मुक्ती, करा हे उपाय
Shani Jayanti 2022 : शनीच्या दशा-अंतरदशाने त्रास होत असेल किंवा साडेसाती आणि धैय्याचा त्रास होत असेल तर शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता. यातून तुम्हाला शनिच्या साडेसातीतून मुक्ती मिळेल.
Shani Jayanti 2022 : शनिदेवाच्या साडेसातीला सर्वसाधारणपणे सर्वच लोक घाबरतात. मात्र, शनिची साडेसाती तुम्हाला फक्त त्रास आणि संकटेच देते असे नाही. कारण काही लोकांची शनीच्या साडेसातीच्याकाळात प्रगती देखील होते. ही प्रगती एवढी होते की त्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यात त्याने तेवढी प्रगती केलेली नसते. कारण शनीची साडेसाती आणि धैय्याचे संपूर्ण परिणाम तुमच्या जन्मपत्रिकेतील शनीचे स्थान पाहून होतात. जर तुम्हालाही शनीच्या दशा-अंतरदशाने त्रास होत असेल किंवा साडेसाती आणि धैय्याचा त्रास होत असेल तर शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता. यातून तुम्हाला शनिच्या साडेसातीतून मुक्ती मिळेल.
शनिच्या साडेसातीतून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे उपाय
सूर्योदयाच्या वेळी घराभोवती असलेल्या पिंपळाच्या झाडाभोवती पांढरा रंगाचा धागा घेऊन तो सात वेळा गुंडाळावा आणि उदबत्ती, नैवेद्य इत्यादींनी शनिदेवाची पूजा करावी. यावेळी शनी स्तोत्राचे पठण करावे.
शनि बीज मंत्र 'ओम प्रम प्रेम प्रण सह शनिश्चराय नमः' चा 21 वेळा जप करा आणि शनिदेवाकडे शनिजन्म दोषांपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करा.
या दिवशी फक्त एकदाच मीठ नसलेलं अन्न खाण्याचा प्रयत्न करा आणि शनिदेवाला प्रिय वस्तूंचे जास्तीत जास्त दान करा.
तसेच या दिवशी पूजा आणि विधी केल्यानंतर उजव्या हाताच्या मधल्या बोटात काळ्या घोड्याच्या नालाची लोखंडी अंगठी घालावी.
पवनपूत्र, अंजनीसुत, परमवीर श्री हनुमानजींच्या हजार नामांचा जप करा.
काळे तीळ, तेल, उडीद, काळे कपडे, वहाणा, लोखंड, मोहरीचे तेल, कुल्ठी, कस्तुरी, सोने असे शनीचे दान ब्राह्मणाला द्यावे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :