Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा 'या' वस्तूंची खरेदी; मिळवा पुण्य फळ
Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ, संपत्ती-वृद्धी आणि स्थैर्य देणारी मानली जाते.

Akshaya Tritiya 2025 : अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) हा अत्यंत शुभ आणि “कधीही क्षय न होणारा” दिवस मानला जातो. या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ, संपत्ती-वृद्धी आणि स्थैर्य देणारी मानली जाते. त्यानुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुमच्या राशींनुसार काय खरेदी करावं हे जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope)
खरेदी करा : सोनं, लाल वस्त्र, लाल रंगाचे दागिने किंवा मंगलसूचक वस्तू
शुभफळ : आर्थिक उन्नती, नविन संधी आणि यश
टिप : लाल रंग वापरल्यास उर्जेत वाढ होईल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
खरेदी करा : चांदी, गृहोपयोगी वस्तू, फर्निचर किंवा वाहन
शुभफळ : घरात सौख्य व समृद्धी वाढेल
टिप : सौंदर्यदृष्टीने खरेदी लाभदायक ठरेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
खरेदी करा : इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, लॅपटॉप, लेखनसामग्री
शुभफळ : बौद्धिक व आर्थिक लाभ
टिप : जुने प्रोजेक्ट्स नव्याने सुरू करण्यासाठी शुभ दिवस.
कर्क रास (Cancer Horoscope)
खरेदी करा : पांढऱ्या रंगाच्या वस्तू, चांदी, घरासाठी वस्तू
शुभफळ : कौटुंबिक सुख व मानसिक शांती
टिप : आई किंवा घरातील स्त्रीसाठी काही घेतल्यास शुभफल मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
खरेदी करा : सोने, महागडे कपडे, सुगंधी वस्तू, सौंदर्यप्रसाधने
शुभफळ : मान, प्रतिष्ठा व लक्ष्मीप्राप्ती
टिप : स्वतःसाठी एखादी लक्झरी वस्तू घेतल्यास उत्तम.
कन्या रास (Virgo Horoscope)
खरेदी करा : पुस्तके, ऑफिससंबंधित वस्तू, औषधी वनस्पती
शुभफळ : ज्ञान, आरोग्य व यश
टिप : कामाचे नियोजन करण्यासाठी हा दिवस उत्तम.
तूळ रास (Libra Horoscope)
खरेदी करा : फॅशनेबल कपडे, दागिने, घरसजावटीच्या वस्तू
शुभफळ : नातेसंबंध सुधारतील, आकर्षण वाढेल
टिप : पार्टनरसोबत खरेदी करणे विशेष शुभ ठरेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
खरेदी करा : लाल/गडद रंगाच्या वस्तू, भोंदू वस्तू, नविन स्कूटर/बाईक
शुभफळ : आत्मविश्वास व स्फूर्ती वाढेल
टिप : नवा करिअर किंवा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी उत्तम वेळ.
धनु रास (Sagittarius Horoscope)
खरेदी करा : धार्मिक वस्तू, पितांबर, यज्ञसामग्री, सोनं
शुभफळ : अध्यात्मिक उन्नती व गुरूचा आशीर्वाद
टिप : दानधर्मही या दिवशी मोठं फळ देतो.
मकर रास (Capricorn Horoscope)
खरेदी करा : काळ्या/निळ्या रंगाच्या वस्तू, ऑफिस बॅग, फाईल्स
शुभफळ : कामात स्थैर्य व आर्थिक वृद्धी
टिप : गुंतवणुकीसाठी हा दिवस अत्यंत शुभ.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
खरेदी करा : तांबे, नवे गॅझेट्स, रचना/डिझाईन संबंधित वस्तू
शुभफळ : नवकल्पना व सामाजिक यश
टिप : इनोव्हेटिव्ह खरेदी फायदेशीर ठरेल.
मीन रास (Pisces Horoscope)
खरेदी करा : धार्मिक चित्र, पिवळ्या वस्तू, सोनेरी कपडे
शुभफळ : मन:शांती, देवकृपा व सर्जनशीलता
टिप : ध्यान/मेडिटेशनसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी कराव्यात.
- डॉ भूषण ज्योतिर्विद
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















