एक्स्प्लोर

Vegetable : हिवाळ्यात 'या' हिरव्या भाज्यांची लागवड करा, भरघोस नफा मिळवा

सध्या देशात थंडीला सुरुवात झाली आहे. अनेक भागात चांगलीच थंडी वाढताना दिसत आहे. या हिवाळ्याच्या काळात हिरव्या भाज्यांचे चांगले उत्पादन होते.

Vegetable farming : सध्या देशात थंडीला सुरुवात झाली आहे. अनेक भागात चांगलीच थंडी वाढताना दिसत आहे. या हिवाळ्याच्या काळात हिरव्या भाज्यांचे चांगले उत्पादन होते. या काळात बाजारात भाज्यांची मागणीही वाढते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आता टोमॅटो, वांगी, मुळा यांची लागवड करावी. या भाजीपाला पिकातून दोन महिन्यांनी त्यांना बंपर उत्पादन मिळेल. फक्त यासाठी त्यांना हिरव्या भाज्यांचे विशेष प्रकार निवडावे लागतील. चांगले पिक येण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य वेळी पाणी द्यावे लागेल.

हिवाळ्यात भाज्यांच्या मागणीत वाढ

हिवाळ्याचा हंगाम हिरव्या भाज्यांसाठी ओळखला जातो. या हंगामात तुम्हाला अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या बाजारात विकल्या जातील. विशेष म्हणजे हिवाळ्यात पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांची चव वेगळी असते. त्यामुळेच हिवाळा वाढला की हिवाळ्यात पिकवल्या जाणाऱ्या हंगामी भाज्यांची मागणीही वाढते. शेतकऱ्यांनी आता नोव्हेंबर महिन्यात हंगामी हिरव्या भाज्यांची लागवड केली तर जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये बंपर उत्पादन मिळेल. ज्याची विक्री करुन त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकेल. अशा परिस्थितीत आज आपण त्या हिरव्या भाज्यांबद्दल बोलणार आहोत. आता पेरणी केल्यास दोन ते तीन महिन्यांत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळेल.

टोमॅटोच्या लागवडीतून मिळतो चांगला नफा

हिरव्या भाज्यांचे असे अनेक प्रकार बाजारात आले आहेत की, जे पेरणी झाल्यावर भाजीपाल्याच्या झाडांना वेळेपूर्वीच फुले आणि फळे येऊ लागतात. जर आपण टोमॅटोबद्दल बोललो तर त्याचे उत्तर नाही. ही एक अशी भाजी आहे, ज्याशिवाय आपण चवदार भाजीची कल्पनाही करु शकत नाही. वर्षानुवर्षे बाजारात याला मागणी असते. बरेच लोक टोमॅटोचा वापर सॅलेड आणि चटणीसाठी करतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केल्यास दोन ते तीन महिन्यांनी बंपर उत्पन्न मिळू शकते. अर्का विकास, 5-18 स्मिथ, सर्वोदय, निवड-4, समय किंग, अंकुश, टोमॅटो 108, विक्रंक, विशाल, विपुलन आणि अदिती यासह टोमॅटोच्या अनेक सुधारित जाती आहेत. शेतकरी कोणत्याही प्रकारची निवड करू शकतात. विशेष म्हणजे टोमॅटोची रोपे लावताना एका ओळीपासून दुसऱ्या ओळीपर्यंतचे अंतर 60 सेंटीमीटर असावे. त्यामुळx झाडांची वाढ झपाट्यानं होते.

40 ते 50 दिवसांत ते तयार होते

नोव्हेंबरमध्ये मुळा पिकाची लागवड करता येते. मुळा पिकासासाठी हिवाळा ऋतू चांगला मानला जातो. हिवाळ्याच्या काळात मुळा झाडांची वाढ झपाट्याने होते. वालुकामय चिकणमाती मुळा लागवडीसाठी चांगली मानली जाते. वालुकामय चिकणमाती जमिनीत मुळा पेरल्यास चांगले उत्पादन मिळते. जपानी व्हाईट, पुसा चेतकी, पुसा देसी, अर्का निशांत, बॉम्बे रेड, पुसा रेशमी, जौनपुरी, पंजाब एजेटी आणि पंजाब व्हाईट या मुळ्याच्या सुधारित जाती आहेत. तुम्ही यापैकी कोणत्याही जातीची पेरणी करू शकता. मुळा पीक 40 ते 50 दिवसांत तयार होते. जर तुम्ही एक हेक्टरमध्ये त्याची लागवड केली तर तुम्ही 250 क्विंटलपर्यंत मुळा विकू शकता, ज्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळेल.

पेरणीपूर्वी बियाण्यांवर प्रक्रिया करा

जर आपण मुळा पेरणीच्या पद्धतीबद्दल बोललो तर प्रथम शेताची व्यवस्थित नांगरणी करावी. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लेव्हल बेड आणि रिज बनवून पेरू शकता. पेरणी करताना एका बियापासून दुसऱ्या बियाण्याचे अंतर 5 ते 8 सेंटीमीटर ठेवावे. त्यामुळे झाडांची वाढ झपाट्याने होते. तथापी, पेरणीपूर्वी मुळा बियाणे प्रक्रिया करावी. 2.5 ग्रॅम थायरममध्ये एक किलो बिया मिसळून उपचार करता येतात.

हिवाळ्यात वांग्याची लागवड फायदेशीर

नोव्हेंबर महिन्यात वांग्याची लागवड करणे चांगले आहे. वालुकामय चिकणमाती माती त्याच्या लागवडीसाठी चांगली आहे. पुसा पर्पल क्लॉन्ग, पूजा क्रांती, पुसा पर्पल क्लस्टर, पुसा पर्पल क्लस्टर, पुसा अनमोल, अन्नामलाई, मुक्तकेशी आणि बनारस जेट या त्याच्या सुधारित जाती आहेत. जर तुम्ही आता वांग्याची लागवड केली तर 60 ते 70 दिवसात उत्पादन सुरू होईल. वांग्याची एक एकरात लागवड केल्यास 120 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.

महत्त्वाच्या बातम्या:

Success Story : राजकारण सोडलं अन् शेतीनं तारलं, वयाच्या 65 वर्षी कमावतायेत 40 लाख रुपये

महत्त्वाच्या बातम्या

सुकाळातल्या जागा बिनविरोध कशा झाल्या? कार्यकर्त्यांनी विरोधात लढायचं आणि नेत्यांनी सत्तेची भाकरी एकत्र बसून खायची, खोतांचा हल्लाबोल, म्हणाले, गोपीचंद पडळकर विस्थापितांचा आवाज
सुकाळातल्या जागा बिनविरोध कशा झाल्या? कार्यकर्त्यांनी विरोधात लढायचं आणि नेत्यांनी सत्तेची भाकरी एकत्र बसून खायची, खोतांचा हल्लाबोल, म्हणाले, गोपीचंद पडळकर विस्थापितांचा आवाज
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
वर्षावर गेल्यास कारवाई! मग काय करायचे ? आझाद मैदानावर ओरडून ओरडून मरायचे? अजित नवलेंचा सरकारला सवाल 
वर्षावर गेल्यास कारवाई! मग काय करायचे ? आझाद मैदानावर ओरडून ओरडून मरायचे? अजित नवलेंचा सरकारला सवाल 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच खात्यावर जमा होणार 2000 रुपये, किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच खात्यावर जमा होणार 2000 रुपये, किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Diwali Firecracker Rules: दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?
दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?
Gokul Election: गोकुळ अध्यक्ष निवडीपूर्वी सावध हालचाली, ठराव धारकांनंतर आता निवडून आलेले संचालक सुद्धा सहलीवर
गोकुळ अध्यक्ष निवडीपूर्वी सावध हालचाली, ठराव धारकांनंतर आता निवडून आलेले संचालक सुद्धा सहलीवर,
Aamir Khan Emotional On Stage: 'कामाच्या नादात मी माणसं, नाती गमावली...'; भर मंचावर आमीर खानच्या डोळ्यांत पाणी, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मनातली खंत बोलून दाखवली
'कामाच्या नादात मी माणसं, नाती गमावली...'; भर मंचावर आमीर खानच्या डोळ्यांत पाणी, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मनातली खंत बोलून दाखवली
Himanshu Bhau: भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
Prithviraj Chavan and Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा, म्हणाले...
मनोज जरांगे पाटलांच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा, म्हणाले...
Bacchu Kadu: बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ, आवाजाच्या नमुन्यासाठी घुग्गुस पोलिसांनी नोटीस धाडली, नेमकं प्रकरण काय?
बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ, आवाजाच्या नमुन्यासाठी घुग्गुस पोलिसांनी नोटीस धाडली, नेमकं प्रकरण काय?
Bollywood Karan Johar Wants Life Partner: 'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
Yusuf Pathan: गुजरात सरकारसोबत 14 वर्षांचा वाद अन् 4 महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेस सोडताच खासदार युसूफ पठाणला बडोद्यात 15 कोटींचा प्लाॅट फुकटात मिळाला
गुजरात सरकारसोबत 14 वर्षांचा वाद अन् 4 महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेस सोडताच खासदार युसूफ पठाणला बडोद्यात 15 कोटींचा प्लाॅट फुकटात मिळाला
Embed widget