सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवकाळीचा दणका, आंब्यासह काजूचं मोठं नुकसान, तोबडतोब पंचनामे करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

राज्याच्या काही भागात सध्या अवकाळी पावसानं (unseasonal rains) धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात गारपीट देखील होत आहे. याचा फटका शेती पिकांना बसत आहे.

Continues below advertisement

Sindhudurg : राज्याच्या काही भागात सध्या अवकाळी पावसानं (unseasonal rains) धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात गारपीट देखील होत आहे. कधी उन्हाचा चटका तर कधी अवकाळी पावसाचा दणका यामुळं शेतकऱ्यांची (Farmers)  पिकं संकटात सापडली आहेत. बदलत्या वातावरणाचा पिकावर मोठा परिणाम होत आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आंहा आणि काजूला पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळं या नुकसानीचे तातडीनं पचंनामे करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यास तत्पर असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. 

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले नितेश राणे? 

कालच्या 3 तारखेला जो अवकाळी पाऊस कोसळला, त्यामुळं माझ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बरेच नुकसान झाले आहे. काही ठिकाणी हाता तोंडाशी आलेला आंबा आणि काजू निसर्गाच्या लहरीपणान माती मोल झाला आहे. निसर्ग लहरीपणान वागत असला तरी हे सरकार आणि पालकमंत्री म्हणून मी जिल्हावासियांच्या पाठीशी नेहमी राहणार असल्याचे नितेश राणे म्हणाले. म्हणूनच या नुकसानीचा पंचनामा ताबोडतोब  करून त्याचा अहवाल पण लगेचच पाठवून करण्याचा निर्देश मी अधिकाऱ्यांना दिल्याचे राणे म्हणाले. नुकसान भरपाय मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहणार असल्याचेही राणे म्हणाले. 

पुढील 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच या भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण होत आहे, तर काही ठिकाणी पावसानं (Rain) हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना (Agriculture Crop)  मात्र मोठा फटका बसताना दिसत आहे. बदलत्या वातावरणामुळं शेतकरी मात्र चिंतेत आहेत. शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळं तातडीनं पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत. तसेच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा धुमाकूळ, पुढील 3 दिवस कसं असणार वातावरण? हवामान विभागानं वर्तवला अंदाज 

 

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola