आठ दिवसांपासून अवकाळीने झोडपले, नंदुरबारमध्ये फळबागांना मोठा फटका, शेतकरी हतबल Photos

अवकाळी पावसानं नंदूरबारमध्ये चांगलंच झोडपलं आहे. पावसानं फळबाळांना मोठा फटका बसला आहे

Continues below advertisement

nandurbar rain

Continues below advertisement
1/5
नंदुरबार जिल्ह्यात देखील गेल्या आठ दिवसापासून रोज अवकाळी पाऊस येत असल्याने जिल्ह्यात प्रचंड नुकसान होत आहे.
2/5
गारपिटीसह पडलेल्या पावसामुळे ३ एकर टरबूज पीक पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. या पिकासाठी शेतकऱ्याने सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.
3/5
मात्र अवकाळी पावसामुळे संपूर्ण मेहनत वाया गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पिकाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्याच्या पाच लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड अडचणीत आली आहे.
4/5
गावातील इतर शेतकऱ्यांचेही काही प्रमाणात नुकसान झाले असून संपूर्ण परिसरात चिंतेचं वातावरण आहे.
5/5
शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे जगणे अधिक कठीण होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola