Manikrao Kokate : कर्जमाफीच्या (loan waiver ) मुद्यांवरुन राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांना (Farmers) सुनावलं आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी कृषीमंत्री कोकाटे पाहणी करत होते. तसेच नुकसानीचा आढावा घेत होते. यावेळी कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला आहे. शेतकरी 5 ते 10 वर्ष वाट बघतात तोपर्यंत कर्ज भरतचं नाहीत. सरकार शेतीमध्ये गुंतवणूकसाठी शेतकऱ्यांना पैसे देणार असल्याचे कोकाटे म्हणाले. भांडवली गुंतवणूक सरकार करत आहे. शेतकरी करतो का? असा सवाल कोकाटे यांनी केला आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज सायंकाळी उशिरा अवकाळीग्रस्त भागाचा दौरा केला. दिवसभर नाशिक शहरात असूनही अवकाळी भागाचा दौरा करणयासाठी कृषीमंत्र्यांना उशीर झाला आहे. पक्षाची बैठक आणि इतर बैठकींना उपस्थिती लावल्याने कृषिमंत्र्यांना दौरा करण्यास उशीर झाला आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळं राज्यातील विविध भागात शेती पिकांना फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यातही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं
गेल्या काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. हल्ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केली. ही योजना चांगली आहे. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. पण, या योजनेलाही गैरव्यवहाराचे ग्रहण लागले. यामुळे सरकार अडचणीत आलेले नाही, पण यातून आता काही सुधारणा निश्चितपणे कराव्या लागणार आहेत. ही योजना सरकारला कोणत्याही स्थिती बंद करायची नाही. त्यात सुधारणा करायची आहे. या प्रकरणी गैरप्रकार टाळण्यासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागतील. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत याविषयी योग्य तो निर्णय घेतला जाईल. सद्यस्थितीत पीक विम्याचे 4 लाख अर्ज नामंजूर करण्यात आलेत. सरकार या प्रकरणी कुठेही अडचणीत नाही. अर्जदार व एजन्सी चालकांच्या चुकांमुळे असे घडले असावे असा माझा अंदाज आहे. त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल. पण यात सुधारणा करण्याची गरज आहे. दरम्यान, कोकाटे यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर शेतकऱ्यांसह विरोधकांनी टीका केली होती.
महत्वाच्या बातम्या:
