एक्स्प्लोर

Unseasonal Rain News: कोल्हापूरसह सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलाच अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यसह विजांच्या कटकडाटासह जोरदार पाऊस झाला.

Unseasonal Rain News : राज्यात एकीकडे उन्हाचा चटका लागत असताना दुसरीकडे मात्र अवकाळी पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारंबळ उडाली आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलाच अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यसह विजांच्या कटकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, या पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. 

राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, काढणीला आलेल्या पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. ऐन उन्हाळ्यात पाऊस आल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. दरम्यान, कोल्हापुरमध्ये पन्हाळा रोडवरील करवीर तालुक्यातील केर्ली इथं चालत्या चारचाकीवर वडाच्या झाडाची भली मोठी फांदी पडून गाडीचे नुकसान झाल्याची घटना घडली. सुदैवाने कोणताही जीवितहानी झाली नाही. ही गाडी शिंगणापूरहून पन्हाळ्याला चालली होती. त्यावेळी ही घटना घडली. ऋषिकेश रोटे असं चालकाचं नाव आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी वादळी वाऱ्यानं झाडे पडल्याची घटना घडली होती. दरम्यान कोल्हापुरात अवकाळी पावसाने जोतिबा डोंगरावरील चैत्र यात्रेचा गुलाल धुऊन काढला आहे. चैत्र यात्रेनंतर हमखास पाऊस पडत असल्याचं भाविकांचं मत आहे.

Unseasonal Rain News: कोल्हापूरसह सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

दरम्यान, दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील चांगलाच अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग च्या काही भागात मुसळधार अवकाळी पाऊस झाला. गोव्यातही मुसळधार अवकाळी झाला आहे. गोव्यातील फोंडा तालुक्यात अवकाळी पाऊस झाला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे तसेच अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील काही भागात गारांचा सुद्धा पाऊस झाला. सकाळपासूनच उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तर जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अर्धा ते पाऊण तास कोल्हापुरात विजेच्या कडकडाटासह धुवांधार पाऊस आणि वारा सुरु होता.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग! विदर्भासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे, नेमकी कशी असणार पावसाची स्थिती? हवामान विभागाचा अंदाज काय?
शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग! विदर्भासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे, नेमकी कशी असणार पावसाची स्थिती? हवामान विभागाचा अंदाज काय?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Embed widget