Dadaji Bhuse : बियाणे आणि खते  केंद्र सरकारकडून मिळणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी दिली. केंद्र सरकारकडून राज्यासाठी 45 लाख मेट्रिक टन खत मिळणार आहे, त्याला केंद्र सरकारने तत्वता मान्यता दिली असल्याचे भुसे म्हणाले. त्यामुळे यावर्षी कोणालाही बियाणे, रासायनिक खते कमी पडणार नसल्याचे भुसे म्हणाले. कृषी योजनांचा 50 टक्के लाभ महिलांना मिळणार आहे. लक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांचे नाव सातबाऱ्यावर लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
दरम्यान, यावर्षी  99 टक्के पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. मात्र, तो नको तेव्हा पडला तर शेतकरी अडचणीत येईल असे दादाजी भुसे म्हणाले.  कृषी, क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा आज नाशिकमध्ये सन्मान झाला. नाशिकमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीनं शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कारांनी  सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात दादाजी भुसे बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
कृषी विभाग महिला शेतकऱ्यांसाठी काही योजना राखीव ठेवणार आहे, त्यांचा लाभ त्यांनी घ्यावा असं आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केलं.


कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतीचे काम सुरु होते. शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टामुळे कोणालाही अन्नधान्य कमी पडले नाही. कोणालाही फळे, दूध, अन्नधान्या कमी पडले नसल्याचे दादाजी भुसे म्हणाले. देशाची, राज्याची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांनी सावरली आहे. शेतकऱ्यांच्या पोरांना कस पिकवायचे हे सांगणे गरजेचे नाही, पण पिकवलेला माल कसा विकायचा हे सांगण्याचे काम कृषी विभाग करणार असल्याचे भुसे म्हणाले. गाव पातळीवरचे नियोजन करायचे असेल तर आरोग्य समिती, पाणी समिती असते. त्यामुळे प्रत्येक गावात कृषी ग्राम विकास समिती स्थापन करण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला. त्यामाध्यमातून किती पाऊस पडतो, कोणती पिके घेतली जातात, किती बियाणे लागणार, खतांची किती आवश्यक आहे, याची माहिती मिळणार आहे असे भुसे म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या: