एक्स्प्लोर

गोड बातमी! साखरेचे भाव कमी होणार; साखर महासंघाच्या अध्यक्षांची माहिती

Sugar Rate News : साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी यावर्षी साखरेचे भाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Sugar Rate News : महाराष्ट्रात यावर्षी ऊस लागवड (Maharashtra Sugarcane News)  क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक कारखान्यात दहा टक्के इथेनॉलचे उत्पादन करुनही साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी साखरेचे भाव कमी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली आहे.

गतवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस काळ झाल्याने उसाची लागवड क्षेत्र वाढले आहे त्यामुळे कारखान्यांचा गाळप हंगाम सुद्धा लांबणीवर पडणार असल्याची माहिती आहे कारण सर्व उसाचे कमी कालावधीत गाळप करणे प्रत्येक कारखान्यांना शक्य नाही . त्यामुळे प्रत्येक कारखान्याचा गाळप हंगाम हा 160 दिवसापर्यंत असावा अशी माहिती जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली आहे.

यावर्षी साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे देशाला दरवर्षी 265 लाख टन इतक्या साखरेची आवश्यकता असते परंतु या वर्षी या पेक्षाही मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे आणि गाळप हंगाम सुरू असल्याने हे उत्पादन अजूनही वाढणार आहे त्यामुळे साखरेचे भाव कमी होण्याची शक्यता आहे मधल्या काळात हीच साखर 3300 रुपये प्रति क्विंटल होती. आता ते भाव कमी होऊन तीन हजार 100 रुपये प्रति क्विंटल असे झाले आहेत. तर पुढील काळात हे भाव तीन हजाराच्या जवळपास असण्याची शक्यता जयप्रकाश दांडेगावकर यांनी वर्तवली आहे.

दरवर्षी मोठ्या प्रमाणात साखरेची निर्यात होत असते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही या साखरेची किंमत घसरण्याची शक्यता सुद्धा नाकारली जाऊ शकत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा मोठ्या प्रमाणात भाव घसरण्याची शक्यता आहे, असं दांडेगावकर यांनी म्हटलं आहे. 

मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील ऊस शिल्लक

महाराष्ट्रात शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे प्रदीर्घ कालावधी होऊनही ऊसतोड होत नसल्याने उसाला तुरे फुटतात आहेत परिणामी उसाच्या वजनात घट होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उसाचा गाळप हंगाम कालावधी वाढवण्यात यावा आणि ऊस बियाणांमध्ये बदल करणे गरजेचे असल्याचे दांडेगावकर यांनी सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळले जाऊ शकते, असं त्यांनी म्हटलं आहे.

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

महापुराची मदत मिळाली नाही, कर्जमाफीचे पैसे मिळाले नाहीत, दुष्काळाचा GR निघाला पण मदत...आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
महापुराची मदत मिळाली नाही, कर्जमाफीचे पैसे मिळाले नाहीत, दुष्काळाचा GR निघाला पण मदत...आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
Bhandara Farmers: भातपिकांवर घातक किडींचा प्रादुर्भाव, बळीराजा दुबार संकटात; भंडाऱ्याच्या शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले, 'तातडीनं शेत बांधावर पोहोचा!'
भातपिकांवर घातक किडींचा प्रादुर्भाव, बळीराजा दुबार संकटात; भंडाऱ्याच्या शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले, 'तातडीनं शेत बांधावर पोहोचा!'
महाराष्ट्रात दुष्काळ! उत्तर प्रदेशात महापूर, आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू, अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत
महाराष्ट्रात दुष्काळ! उत्तर प्रदेशात महापूर, आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू, अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Embed widget