एक्स्प्लोर

Yavtmal Farmer Agitation : भोंग्याचे राजकारण बंद करा, चना खरेदी सुरळीत करा, यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचे भोंगा आंदोलन

जिल्ह्यात नाफेडमार्फत सुरु असलेली चना खरेदी मंदावली आहे. त्यामुळे त्या ठिकाणचा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

Yavtmal Farmer Agitation : यवतमाळ जिल्ह्यात नाफेडमार्फत सुरु असलेली चना खरेदी मंदावली आहे. त्यामुळे त्या ठिकाणचा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खरेदी मंदावल्याने तेथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. चना खरेदीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी  याठिकाणी शेतकऱ्यांनी भोंगा आंदोलन केले. शेतकऱ्यांनी सायकलवर भोंगा लाऊन आक्रोश रॅली काढली.

यवतमाळ जिल्ह्यात नाफेडमार्फत सुरु असलेली चना खरेदी मंदावल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बारदाना उपलब्ध होत नसल्याने व चना साठवणुकीसाठी गोदाम नसल्याने तसेच प्रशासकीय अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले. आर्णी येथे शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार यांच्यासह शेतकऱ्यांनी सायकलवर भोंगा लाऊन आक्रोश रॅली काढली. महापुरुषांच्या प्रतिमांना वंदन करुन भोंग्याचे राजकारण बंद करा, चना खरेदी सुरळीत करा अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील निवेदन पाठवण्यात आले आहे. या सायकल रॅलीद्वारे शेतकऱ्यांनी नाफेडच्या केंद्रावर धडक देत त्याठिकाणी सामूहिक मारुती स्तोत्र पठण केले. 


Yavtmal Farmer Agitation : भोंग्याचे राजकारण बंद करा, चना खरेदी सुरळीत करा, यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचे भोंगा आंदोलन

नाफेडकडून चना खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसून, त्यांची लूट सुरु आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नाफेडच्या केंद्रावर सर्व सुविधा पुरवाव्यात अन्यथा शिवसेना अक्षय तृतीयेनंतर हिसका आंदोलन करेल असा ईशारा बाळासाहेब मुनगीनवार यांनी दिला.  सर्व सेंटर लवकर सुरु झाली पाहिजेत. जर तसे झाले नाहीतर आम्ही संपूर्ण यवतमाळ  जिल्हाभर आंदोलन करु असा इशारा मुनगीनवार यांनी दिला आहे. नाफेडकडून दररोज 1 हजार 500 पोत्यांची खरेदी झाली पाहिजे. नाहीतर शिवसेना पद्धतीने आम्ही आंदोलन करु असेही ते म्हणाले.

जेवढा हवा तेवढा बारदाना सध्या उपलब्ध होत नाही.  बारदाना उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी नाफेडची आहे. मात्र त्यांच्याकडून पूर्तता केली जात नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी आंदोलकांकडून भोंग्याचे राजकारण बंद करा, चना खरेदी सुरळीत करा अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
Dharashiv: तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; धाराशिवाच्या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
पाच हजारांची मदत अपुरी, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, शेतकऱ्यांच्या भावना पोहोचवणार, तटकरेंची माहिती, तर अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही
पाच हजारांची मदत अपुरी, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, शेतकऱ्यांच्या भावना पोहोचवणार, तटकरेंची माहिती, तर अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Embed widget