राज्यातील सर्वसामान्यांना सणासुदीच्या काळात बेदाणा स्वस्तात मिळण्याची शक्यता आहे. यंदा परदेशातून बेदाण्याची मागणी यंदा घटल्याने राज्यात सोलापूर, सांगलीसह कोल्डस्टोरेजमध्ये बेदाण्यांचा मोठा साठा पडून आहे. परिणामी दर घसरले असून प्रतिक्विंटल दर साधारण १० ते १४ हजरांच्या आसपास गेल्याचे पणन विभागाच्या माहितीवरून दिसून येतंय. राज्यात तासगाव वगळता कोणत्याही बाजारसमितीत बेदाण्याची आवक झाल्याची दिसत नाही. यंदा बेदाण्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने बेदाण्याचा दर सरासरी १५० रुपयांच्या पुढे जात नसल्याचे दिसून येत आहे.


परदेशातून मागणी घटली..


महाराष्ट्रातून सौदी अरेबीयासह अन्य आखाती देशांमध्ये बेदाण्यांची निर्यात होते.  तुर्कस्तान, इंडोनेशिया, जर्मनी, नेपाळ या देशांना प्रामुख्याने बेदाणा महाराष्ट्रातून पाठवला जातो. यंदा या देशांमध्ये बेदाणा उपलब्ध असल्याने राज्यातील बेदाण्याची मागणी घटली आहे. पुढील काही महिन्यात ही निर्यात वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.


तासगावचा बेदाणा घरातच पडून


जगभरात तासगावचा बेदाणा प्रसिद्ध आहे. तासगावच्या बेदाण्याला जीआय मानांकनही मिळालेले असून या टॅगचा फारसा फायदा होत नसल्याचेच चित्र आहे. मागील चार दिवसात तासगाव बाजारसमितीत दररोज साधारण ६ ते ८ हजार क्विंटल बेदाण्याची आवक असून त्याला प्रतिक्विंटल भाव १० ते १४ हजारांपर्यंत मिळत आहे. किलोमागे सरासरी १४० रुपयांनी बेदाण्याची विक्री सध्या होत असून सणासुदीच्या काळात मनुका स्वस्त होण्याची शक्यता आहे.


मागील वर्षीचा बेदाणा विकला जातोय


बेदाणा लिलावासाठी तासगाव, सोलापूर, पंढरपूर बाजार समितीत मोठ्या प्रमाणात माल येतो. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्यासाठी स्वतंत्र मार्केट सुरू करण्यात आले आहे. सध्या दर बल गुरुवारी बेदाणा लिलाव होत आहे.  यंदाच्या हंगामात सुरुवातीला बेदाण्याचा दर तीनशे रुपयांपर्यंत गेला होता. त्यामुळे यंदा बेदाण्याला मोठी नसल्यामुळे सध्या कोल्ड स्टोरेजमध्ये बेदाणा पडून आहे. सध्या मागील वर्षीचा बेदाणा आता विकला जात आहे.