महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केलेला आहे. त्यानंतर आता मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझेंनी केला होता. त्याचबरोबर वाझेंनी (Sachin Waze) उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचे वक्तव्य वाझेंनी दिली आहे. या प्रकरणावर अनिल देशमुख यांनी तातडीने पत्रकार परिषद देऊन केलेल्या आरोप फेटाळले आहेत. 


काय म्हणाले अनिल देशमुख?


"देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. मी काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे आता सचिन वाझे मार्फत माझ्यावर आरोप केले जात आहे. परंतु सचिन वाझे गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याच्या कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. दोन खुनाच्या प्रकरणात सचिन वाझे कारागृहात आहे."


"मी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जे आरोप केले, जी वस्तुस्थिती समोर आणली, कशा पध्दतीने देवेंद्र फडणवीसांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना तुरूगांत टाकण्यासाठी ३ वर्षांपुर्वी कशा पध्दतीने मी ऑफिडेव्हिट करून द्यावं यासाठी माझ्या समोर जो प्रस्ताव आणला होता. ही गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्रासमोर आणली, जनतेसमोर मांडली, त्यानंतर आता ही देवेंद्र फडणवीसांची नवी चाल आहे."


"सचिन वाझे जे बोलले ते ही देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे. देवेंद्र फडणवीसांना पहुतेक हे माहिती नाही, मुंबई हायकोर्टाचा आदेश आहे, हायकोर्टाचने सचिन वाझेबद्दल बोलताना सांगितलं आहे, तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे, दोन खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. आताही तो एका खुनाच्या गुन्ह्यामध्ये तुरूंगात आहे. सचिन वाझेची गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. सचिन वाझेच्या कोणत्याही जबाबावर विश्वास ठेवता येत नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे."


"अशा माणसाकडून माझ्यावर देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर आरोप लावायला सांगितले आहे. तो विश्वास ठेवण्यासारखा माणून नाही, असं कोर्टाने देखील म्हटलं आहे. मी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांनतर त्यांनी माझ्याविरोधात सचिन वाझेला पुढं केलं आहे. त्याला माझ्याविरोधात पतत्र लिहायला लावलं माझ्यावर आरोप करायला सांगितलं", असल्याचं अनिल देशमुखांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. 


सचिन वाझे (Sachin Waze) हे सध्या तुरुंगात आहे. त्यांच्यावर सध्या  मनसूख हिरेन हत्याकांड आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र  ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सध्या ते तुरुंगात शिक्षा भोगत आह. सत्तांतर झाले त्यानंतर अनिल देशमुखांवर वसुलीचे आरोप करण्यात आले. परमबीर सिंग यांनी देखील गंभीर आरोप केले होते. आता त्याची पुष्टी सचिन वाझेंनी केली आहे. सचिन वाझे हे त्यावेळी वारंवार बंगल्यावर जात होते. त्यावेळी ते पीएच्या संपर्कात होते. आता सचिन वाझेंनी (Sachin Waze) समोर येऊन देशमुख पीएच्या माध्यामातून पैसे घ्यायचे हे स्पष्ट केले आहे. आरोपच नाही केले तर देवेंद्र फडणवीसांना देखील त्यांनी या संदर्भातील पत्र लिहित पुरावे दिले आहे. त्यामुळे आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.