Sushma Andhare : सचिन वाझे (Sachin Vaze) आता ज्या टायमिंगमध्ये बोलत आहेत, हे टायमिंग खूप महत्वाचे आहे. वाझेंना पत्रच लिहायचं होतं तर त्यांनी इतके दिवस का लिहलं नाही. पत्र लिहायचंच होतं तर तपास संस्थेला, न्यायधिकृत संस्थेला  का लिहलं नाही. ते पत्र देवेंद्र फडणवीसांनांच (Devendra Fadnavis) का लिहलं? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपस्थित केला आहे. वाझेंनी फडणवीसांना पत्र लिहावं, यामध्येच संशयाला खूप जागा असल्याचे अंधारे म्हणाल्या. हा सगळा लोकांना मूर्खात काढायचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या. फडणवीसांनीच वाझेंकडून पत्र लिहून घेतलं नाही हे कशावरुन असंही अंधारे म्हणाल्या. 


फडणवीस संशयाच्या भोवऱ्यात


सचिन वाझे म्हणजे काय हरिश्चंद्र आहे काय? ज्या सचिन वाझेंवर ढिगाने आरोप आहेत. ते आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत असेही अंधारे म्हणाल्या. भाजप वारंवार अनेक लोकांवर आरोप करते आणि त्यांनतर त्या लोकांना पक्षात घेते असे सुषमा अंधारे म्हणाल्या. फडणवीसांवर चौफेर हल्ले होतायेत, फडणवीस संशयाच्या भोवऱ्यात आहेत, फडणवीसांनी महाराष्ट्राची संस्कृती पायदळी तुडवली, फडणवीसांनी इथले पक्ष फोडले, फडणवीसांनी कायदा सुव्यवस्थेचा वापर जनकल्याणासाठी न करता विरोधकांनी जेरीस आणण्यासाठी केला, असे अनेक आरोप त्यांच्यावर असल्याचे अधारे म्हणाल्या. यातून फडणवीसांची सुटका करुन घेण्यासाठी फडणवीसांनीच वाझेंकडून हे पत्र लिहून घेतलं नाही हे कशावरुन हा माझा स्षष्ट आरोप असल्याचे अंधारे म्हणाल्या. 


अनिल देशमुखांनी फडणवीसांवर आरोप केल्यावरच वाझेंनी का पत्र लिहलं


अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेऊन जेव्हा फडणवीसांवर काही आरोप केले आहेत.  आशा काळात वाझेंनी फडणवीसांना पत्र लिहलं आहे. त्यांना पत्रच लिहायचं होतं तर इतके दिवस का लिहलं नाही. पत्र लिहायचंच होतं तर तपास संस्थेला, न्यायधिकृत संस्थेला का लिहलं नाही? ते पत्र फडणवीसांनांच का लिहलं जातं असा सवाल अंधारे यांनी केलाय. 


नेमकं प्रकरण काय?


वसुली प्रकरणामध्ये सचिन वाझे यांनी आता नवीन गौप्यस्फोट केला आहे. सचिन वाझे यांनी  उपमुख्यमंत्री आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. यामध्ये त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देखील नाव घेतले आहे. तसेच अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोपही वाझे यांनी केला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


वसुली प्रकरणात सचिन वाझेचा नवा बॉम्ब! फडणवीसांना लिहलेल्या पत्रात जयंत पाटलांचेही घेतले नाव