Cattle Feed Price : दुधाच्या उत्पादन (Milk Production) खर्चात  यावर्षी मोठी वाढ झाली आहे. दुधाळ जनावरांच्या चाऱ्याच्या दरात (Cattle Feed inflation price) मोठी वाढ झाली आहे. चाऱ्याचे दर हे मागील 9 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. यावर्षी ऑगस्टमध्येच पशुखाद्याच्या महागाईनं (inflation) मागच्या 9 वर्षांचा विक्रम मोडला आहे. ऑगस्टमध्ये या किंमती 25.54 टक्क्यांनी वाढल्या होत्या. परंतू नोव्हेंबरपर्यंत हा आकडा वाढला  आहे. सध्या चाऱ्याच्या किंमतीत 27.66 टक्क्यांवर पोहोचल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्याच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं दुग्ध व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांचा उत्पादन खर्च वाढला आहे.


दुग्ध उत्पादन खर्च वाढला, पशुपालक चिंतेत


चाऱ्याच्या दरात सतत होणारी वाढ ही पशुपालकांची चिंता वाढणारी आहे. यामुळं पशुपालन करणाऱ्या ग्रामीण कुटुंबांचा खर्च वाढला आहे. चांगल्या दुग्धोत्पादनासाठी जनावरांना चारा दिला जात नाही. जनावरांच्या आरोग्यासाठीही ते आवश्यक आहे. मात्र, गेल्या काही महिन्यातील वाढत्या महागाईमुळं पशुपालकांची चिंता वाढली आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं घाऊक किंमत निर्देशांक (WPI) ची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये नोव्हेंबरमध्ये पशुखाद्याचे निर्देशांक मूल्य 225.7 नोंदवले गेले आहे. मागील वर्षी हेच निर्देशांक मूल्य 176.8 नोंदवले गेले होते. या आकडेवारीनुसार वर्षभरात चाऱ्याची किंमतीत 28 टक्क्यांची वाढ झाली आहे. पशुखाद्याबरोबरच कुक्कुट खाद्याच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. डिसेंबर 2021 पासून पशुखाद्य आणि धान्याच्या किंमती वाढत आहेत. गेल्या 10 महिन्यांपासून या किंमती सातत्यानं वाढत आहेत.


केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला काय म्हणाले...


13 डिसेंबरला लोकसभेतही पशुखाद्याच्या महागाईच्या संदर्भातील मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी सांगितले की, देशात अजूनही पशुखाद्याचा तुटवडा आहे. त्यामुळं देशात पशुखाद्याच्या किंमतीत वाढ होत आहे. देशात 11.24 टक्के हिरव्या चाऱ्याची, 23.4 टक्के कोरड्या चाऱ्याची कमतरता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या देशात चाऱ्याचे कोणतेही संकट नाही. मात्र चाऱ्याच्या तुटवड्यामुळं दरात थोडी वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाला चारा प्लस मॉडेल अंतर्गत 100 चारा-उन्मुख एफपीओ तयार करण्यास मान्यता दिली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Milk Production : जागतिक दूध उत्पादनात भारताचा 23 टक्के वाटा, मागील आठ वर्षात मोठी वाढ, देशात 'हे' राज्य आघाडीवर