India Omicron BF.7: चीनमध्ये (China) कोरोना व्हायरस (Coronavirus In China) पुन्हा एकदा झपाट्यानं पसरत आहे. समोर आलेल्या एका अहवालानुसार, Omicron चं सब-व्हेरियंट BF.7 हे चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं होत असलेल्या वाढीमागील प्रमुख कारण आहे. या सब-व्हेरियंटमुळे आता भारत सरकारचीही चिंता वाढली आहे. भारतात आतापर्यंत BF.7 ची चार प्रकरणं आढळून आली आहेत. गुजरात आणि ओदिशात प्रत्येकी 2 प्रकरणं समोर आली आहेत. जाणून घेऊयात, BF.7 सब-व्हेरियंटची लक्षणं आणि कारणं काय? 



  • BF.7 हा Omicron च्या BA.5 व्हेरियंटचा सब-व्हेरियंट आहे. याचा प्रसार अधिक वेगानं होण्याची शक्यता असून याचा इनक्यूबेशन कालावधीही कमी आहे.

  • सब-व्हेरियंट BF.7 बद्दल सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे, ज्यांना कोरोनाची लस मिळाली आहे अशा लोकांना देखील या व्हेरियंटची लागण होऊ शकते.  

  • अहवालानुसार, BF.7 प्रकार श्वसन प्रणालीच्या वरच्या भागाला संक्रमित करतो. त्यामुळे ताप, खोकला, घसादुखी, नाक वाहणं, अशक्तपणा, थकवा यांसारखी लक्षणं दिसतात. लागण झालेल्या काही व्यक्तींमध्ये उलट्या आणि जुलाब यांसारखी लक्षणं देखील जाणवतात. 

  • आरोग्य तज्ञांच्या मते, नवा सबव्हेरियंट देखील पूर्वीच्या प्रकारासह नैसर्गिक संसर्गामुळे एखाद्या व्यक्तीनं विकसित केलेली प्रतिकारशक्ती त्वरीत बायपास करते.

  • वेस्टमिन्स्टर विद्यापीठातील वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रातील वरिष्ठ व्याख्याता मनाल मोहम्मद म्हणतात की, BF.7 ची लागण झालेली एक व्यक्ती 10-18 लोकांना संक्रमित करू शकते. यापूर्वी आलेला कोरोनाचा Omicron व्हेरियंटचा संसर्ग केवळ 5 रुग्णांना बाधित करतो. 

  • दरम्यान, गेल्या 24 तासांत देशात कोरोना व्हायरसचे 129 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 3,408 आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे फक्त एकाचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 30 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


चीनमध्ये BF.7 च्या रुग्णांमध्ये का होतेय वाढ? 


चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये प्रकरणे वाढण्याची अनेक कारणे आहेत. चीनचं कोरोना धोरण हे सर्वात मोठं कारण आहे. चीननं दीर्घकाळापासून झिरो कोविड पॉलिसीचं पालन केलं आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचे एक-दोन व्हेरियंट समोर आले तरी चीनमध्ये लॉकडाऊन झालं असतं. त्यामुळे तिथे व्हेरियंटचा प्रादुर्भाव झालेला नाही. तसेच, या व्हायरसविरोधात त्यांची प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकली नाही. याशिवाय, चीनमध्ये अजूनही सर्वांना कोरोनाची लस मिळालेली नाही. चीनमधील वृद्ध लोकसंख्येमध्ये, फार कमी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या वृद्ध व्यक्तीला आधीच दुसरा काही आजार असेल, तर कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याची प्रकृती अधिक गंभीर होत असल्याची प्रकरणं समोर आली आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


BF.7 व्हेरियंटचे भारतात चार रुग्ण, 18 पट वेगानं पसरणाऱ्या ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटची लक्षणं काय?