एक्स्प्लोर

मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढील 5 दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे, कृषी विद्यापिठाची शिफारस काय? वाचा..

मराठवाड्यात अनेक भागात वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काय करावे? वाचा वसंतराव नाईक कृषी विद्यापीठानं दिलेला कृषीसल्ला...

Marathwada Weather Update: राज्यभरात पुढील पाच दिवस पावसाला पोषक स्थिती तयार झाली असून मराठवाड्यात आजपासून 28 जूनपर्यंत पावसाची हजेरी राहणार असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्रानं सांगितलं आहे. मराठवाड्यात अनेक भागात वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणीच्या हलचाली कराव्यात की नाही? पीक व्यवस्थापन कसे करावे यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून कृषी हवामान आधारित कृषी सल्ला देण्यात आला आहे.

पुढील पाच दिवस मराठवाड्यात हवामान कसे?

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 24 व 25 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात, दिनांक 26 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 24 जून रोजी काही ठिकाणी तर दिनांक 25 व 26 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 27 व 28 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

शेतकऱ्यांनी काय करावे?

  • पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच कापूस पिकाची लागवड करावी. कापूस पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. 
  • कापूस पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. लागवड केलेल्या कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. 
  • पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच तुर पिकाची पेरणी करावी. 
  • तुर पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या तुर पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. 
  • पावसाळ्यात तूर पिकावरील फायटोप्थोरा करपा टाळण्यासाठी, शेताच्या चारी बाजूस तीन फूट खोल आणि दोन फूट रुंद चर काढावी जेणे करून अतिवृष्टी मध्ये शेतातील मातीची धूप होणार नाही व पिकाचे मुळे सडणार नाहीत. तसेच पुढे चरातील पाणी पाऊस ओसरल्यावर शेतातील पिकास परत कामी येईल. 
  • पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच मूग/उडीद पिकाची पेरणी करावी. मूग/उडीद पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते.
  • पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या मूग/उडीद पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच भुईमूग पिकाची पेरणी करावी.
  • भुईमूग पिकाची पेरणी 7 जूलै पर्यंत करता येते. पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या भुईमूग पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. 
  • पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच मका पिकाची पेरणी करावी. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते. पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या मका पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.

 फळबागेचे व्यवस्थापन कसे कराल?

  • नवीन केळी बागेची लागवड करून घ्यावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. लागवडीच्या वेळेस शेणखत तर लागवडीनंतर 30 दिवसाने रासायनिक खत व्यवस्थापन करावे. 
  • केळी बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.नवीन आंबा लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. 
  • आंबा बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व रोगनाशकाची फवारणी करावी. 
  • द्राक्ष बागेतील अतिरिक्त बगल फुटी काढून घ्याव्यात जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश डोळ्यावर पडलयास डोळा फुटण्यास मदत होते. द्राक्ष बागेतील वेलीची बांधणी करावी. द्राक्ष बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
  • नवीन सिताफळ लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. सिताफळ बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

 

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget