Monsoon News : यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. याबाबत एबीपी माझा डीजिटलने कृषी आणि हवामान अभ्यासक उदय देवळाणकर तसेच भवतालचे संपादक आणि पर्यावरणाचे अभ्यासक अभिजीत घोरपडे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज चांगला आहे. हा अंदाज शेतकऱ्यांना दिलासा देणारा असून, महाराष्ट्रात यावर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचे मत उदय देवळाणकर यांनी सांगितले. तर हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज जर खरा ठरला तर महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, मान्सूनच्या सुधारीत अंदाजाची वाट बघावी लागले अस मत अभिजीत घोरपडे यांनी व्यक्त केले.


भारतीय शेतीच्या दृष्टीने ही चांगली बातमी आहे. कोरडवाहू शेतीच्या दृष्टीने हा पाऊस चांगला असणार आहे. 15 जुलै ते 15 ऑगस्ट यादरम्यान देशात सर्वदूर चांगला पाऊस पडणार असल्याचे देवळाणकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी मार्केट आणि हवामान याला अनुसरुन पिकांची निवड करावी असेही देवळाणकर म्हणाले.


हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज जर खरा ठरला तर महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, मान्सूनच्या सुधारीत अंदाजाची वाट बघावी लागले. तो अंदाज मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येत असतो असे मत भवतालचे संपादक आणि पर्यावरण अभ्यासक अभिजीत घोरपडे यांनी व्यक्त केले. सध्याच्या परिस्थितीवर मान्सूनचा 'ला-निना' हा घटक संपूर्ण मान्सूनच्या काळात सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने पाऊस समाधानकारक असू शकेल असेही घोरपडे म्हणाले.


भारताचे एकूण 36 हवामान विभाग आहेत. तर महाराष्ट्रात 4 हवामान विभाग आहेत. हे हवामान विभाग त्यांचे अंदाज जाहीर करत असते. पण भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो असे देवळाणकर म्हणाले. शेतकऱ्यांनी मान्सून वाचायला शिकावा, वाऱ्याचा अंदाज घ्यावा, हवामान विभागाने दिलेल्या माहितीचा अभ्यास करावा असेही देवळाणकर म्हणाले. चांगले पाऊसमानहोणार असल्याने मराठवाडा आणि विदर्भातील कापूस आणि सोयाबीनलाही चांगले दर मिळतील तसेच मका पिकालाही चांगला दर मिळेल असे देवळाणकर म्हणाले. दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी सुटेबल अशा प्रकारची पिके घ्यावीत. मार्केट आणि हवामान याला अनुसरुन पिकांची निवड करावी. पिकांची निवड करताना कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र यांचा सल्ला घ्यावा. त्यानुसारच पिकांचे नियोजन करावे असे देवळाणकर म्हणाले.


देशातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यंदा देशात पाऊसमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे. यंदा देशात चांगला पाऊस राहणार असल्याने शेतकऱ्यांना एका प्रकारचा दिलासा मिळाला आहे. यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होणार असल्यानं ही शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. कारण दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. त्यामुळे सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. अखेर हवामान विभागाचा अंदाज आज जाहीर झाला आहे.


इतर महत्त्वाची बातमी: 


स्कायमेटचा दावा 'मान्सून दाखल' तर हवामान विभागाचा '3 जूनपर्यंत आगमनाचा अंदाज', सामान्य माणूस संभ्रमात