Hanuman Jayanti 2022 : चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. यावेळी 16 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा किंवा हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. हनुमानजींची जयंती देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यावेळी हनुमान जयंती शनिवार असल्याने ती आणखीनच खास झाली आहे. धार्मिक मान्यतेनुसार शनिवार हा दिवस हनुमान आणि शनिदेवाच्या पूजेसाठी शुभ मानला जातो. या दिवशी शनिदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी काही उपाय करणे फायदेशीर ठरते. जाणून घेऊयात शनिदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी या दिवशी कोणते उपाय केले जाऊ शकतात. जाणून घेऊयात. 


हनुमान जयंतीला शनिदोषापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय 


हनुमानाच्या प्रतिमेसमोर दिवा लावा : असे मानले जाते की, हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीला केवडा, अत्तर आणि गुलाबाची माळ अर्पण करावी. तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावून11 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करावा. असे केल्याने एकीकडे शनिदेवापासून मुक्ती मिळते. तर दुसरीकडे हनुमानजींचा आशीर्वादही प्राप्त होतो. 


राम रक्षा स्तोत्र वाचा : हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात श्री राम, माता सीता आणि हनुमानजींच्या मूर्तींचे दर्शन घेताना, रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने हनुमानाचा आशीर्वाद मिळतो. याबरोबरच शनिदेवाचा आशीर्वादही मिळतो. 


सिंदूर चोळा अर्पण करा : असे मानले जाते की, हनुमानजींना सिंदूर खूप प्रिय आहे. त्यामुळे संकटांपासून मुक्ती मिळविण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला सिंदूर अर्पण करा. यामुळे बजरंगबली प्रसन्न होतात आणि त्यांना आरोग्य, सुख आणि समृद्धी प्राप्त होते. एवढेच नाही तर, शनिदेवाचा प्रकोपही कमी होतो.


नारळाचा उपाय प्रभावी : या दिवशी एक नारळ घेऊन हनुमान मंदिरात जावे आणि हनुमानजींच्या समोर तो नारळ फोडून सात वेळा प्रहार करावा. हा उपाय केल्याने तुमचे सर्व अडथळे दूर होतील. 


पिंपळाच्या पानांनी उपाय : या दिवशी हनुमानजींना गुलाबाची माळ अर्पण करा. तसेच 11 पिंपळाच्या पानांवर श्री रामाचे नाव लिहून त्यांची माला बनवून हनुमानजींना अर्पण करा. असे केल्याने बजरंगबलीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि शनिदेव कधीच त्रास देत नाहीत. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा


महत्वाच्या बातम्या :