Maharashtra Weather Updates : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान कमालीचं वाढताना दिसत आहे. हळूहळू तापमानात वाढ होणार असल्याचं देखील बोललं जात आहे. 14 मार्चनंतर विदर्भात सूर्यनारायण भयंकर तापला असून अकोला आणि चंद्रपुरात सर्वोच्च तापमानाच्या नोंदी झाल्या आहेत. संपूर्ण राज्यात अकोल्याचा पहिला नंबर आहे. तापमान वाढीत मागील 5 दिवस सलग उच्चांकी नोंद अकोल्यात करण्यात आली आहे. 


23 मार्च ते 27 मार्च अकोल्यातील तापमान सर्वाधिक असल्याची भारतीय हवामान खात्याची नोंद आहे.  वायव्येकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पश्चिम विदर्भात काही दिवसात सर्वाधिक तापमान होण्याची चिन्हं आहेत.  राजस्थानमधून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमानात बदल झाला आहे. 


14 मार्च रोजी रत्नागिरीत 40.2 अंश सेल्सिअस तापमान, त्यानंतर 17 आणि 22 मार्च तारखा वगळता अकोलाच तापमानाच्या बाबतीत पहिल्या स्थानी असल्याचं दिसून येतंय. 17  मार्च रोजी विदर्भात चंद्रपूरमध्ये 43 अंश सेल्सिअस इतकी नोंद तर 22 मार्च रोजी 42 अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली होती.  स्थानिक स्टेशनची जागा, वाऱ्यांचा वाहणारा वेग, बाष्प पॅटर्न आणि उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात बदल होऊ शकतात, असं तज्ञांचं म्हणणं आहे. 


15 पासून कालपर्यंत अकोल्यातील तापमान कसं होतं?
 
15 मार्च - 41.1


16 मार्च - 42.9


17 मार्च - 42.8 — चंद्रपूर - 43


18 मार्च - 42.7


19 मार्च - 42.1


20मार्च - 41.9


21 मार्च - 41.7


22 मार्च - 41.4 — चंद्रपूर - 42 


23 मार्च - 41.6


24 मार्च - 42


25 मार्च - 42.3


26 मार्च - 42.8


27 मार्च - 42.3


हळूहळू तापमानात वाढ होणार असून  नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. दिवसा वाढलेल्या तापमानाचा परिणाम रात्रीच्या तापमानावर देखील होणार आहे. वाढत्या झळांमुळे आता रसवंती गृह आणि लिंबू सरबताच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



हे देखील वाचा-